महाविकास आघाडीचे जय-वीरू कोण? चर्चा तर होणारच...कारणही तसंच हटके

एका ट्विटनं रंगलीय चर्चा...
Sanjay Raut and Nawab Malik
Sanjay Raut and Nawab Malik

मुंबई : शोले या हिंदी चित्रपटातील जय-वीरूची (Jai-Veeru) जोडी अजरामर झाली आहे. ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे...’ हे या जोडीचं गाणं आजही प्रत्येकाला आपलंसं वाटतं. या गाण्याची आज आठवण येण्याचं कारणंही तसंच हटकं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या एका ट्विटची जोरदार चर्चा सुरू आहे. तसं त्यांचे दररोजच त्यांच्या ट्विटकडं सगळ्यांचे डोळे लागलेले असतात. पण आज त्यांनी हटके ट्विट करत आपल्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मलिकांचे मित्र म्हणजे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut). आज राऊतांचा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण मलिकांनी दिलेल्या हटके शुभेच्छांची चर्चा रंगली आहे. मलिकांनी ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंग, तोडेंगे दम मगर, तेरा साथ ना छोडेंगे,’ असं ट्विट करत राऊतांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जय-वीरूमधील दोस्ती अन् हे गाणं अजरामर झालं आहे.

Sanjay Raut and Nawab Malik
आधी कोठडीतलं जेवण खा, नंतर घरच्या जेवणाचं बघू!

त्यामुळं मलिकांना यातून नेमकं काय सुचवायचं आहे, याचीच चर्चा सुरू आहे. मागील काही दिवसांपासून मलिक हे जवळपास दररोज पत्रकार परिषद घेत आहेत. ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक केल्यानंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात मलिक यांनी मोहिमचं उघडली आहे. मलिकांनी त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपलाही त्यांनी अंगावर घेतलं आहे.

मलिकांच्या या आरोपांना संजय राऊत यांचीही साथ मिळताना दिसत आहे. दररोज माध्यमांशी बोलताना राऊत हे मलिकांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिल्याचे दिसते. महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात येण्यामध्ये राऊत यांचीही महत्वाची भूमिका राहिली आहे. त्यावेळी तेही दररोज पत्रकार परिषद घेत भाजपला अंगावर घेत होते. तर आता मलिकांकडून भाजपवर गंभीर आरोप केले जात आहेत.

त्यामुळे मलिकांनी आज ट्विट करून महाविकास आघाडीचे जय-वीरू आपण दोघे असल्याचे तर राऊतांना सुचवले नसेल ना, अशी चर्चा आहे. भाजप नेत्यांकडून आघाडी सरकार कोसळणार असल्याची वक्तव्य केली जातात. त्यालाही यातून उत्तर दिल्याचं बोललं जात आहे. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी हे एकत्र येण्याचे संकेत असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com