आणखी एक मंत्री अडचणीत...सरकारी प्रकल्पाच्या तपासणीसाठी पित्याच्या जागी पोचला मंत्रीपुत्र

मुख्यमंत्र्यांच्या महत्वकांक्षी प्रकल्पाची तपासणी करण्यासाठी मंत्र्यांच्या जागी त्यांचा पुत्र गेल्याची बाब समोर आली आहे.
bihar minister rampreet paswans son inspects government scheme
bihar minister rampreet paswans son inspects government scheme

पाटणा : सरकारी प्रकल्पाची तपासणी करण्यासाठी मंत्र्याच्या जागी त्याचा पुत्र गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणावरुन गदारोळ सुरू झाला आहे. याआधीही बिहारमध्ये एका मंत्र्याच्या जागी त्याच्या भावाने सरकारी कार्यक्रमाचे उद्घाटन केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी विरोधक आक्रमक झाले असून, त्यांनी सरकारला धारेवर धरले आहे.  

बिहारचे सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी मंत्री रामप्रीत पासवान हे आता अडचणीत आले आहेत. ते पुत्रासमवेत एका खासगी कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी पूर्णिया जिल्ह्यात गेले होते. त्यानंतर ते तेथून निघून आले मात्र, मंत्रीपुत्राने अधिकाऱ्यांना घेऊन एका सरकारी योजनेचा तपासणी दौरा केला. ही योजना मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प नल जल योजना आहे. मंत्रीपुत्राने सरकारी योजनेचा तपासणी दौरा केल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठा गदारोळ उडाला. यामुळे मंत्र्यांसह त्यांच्या विभागावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. 

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मंत्रीपुत्र सरकारी योजनेची तपासणी करीत असतानाची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली. त्यांनी या प्रकरणी सरकारला धारेवर धरले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वांत कमजोर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कमजोर सरकारचा कारभार सुरू आहे. कधी एका मंत्र्याचा भाऊ सरकारी योजनेचे उद्घाटन करतो तर कधी मंत्र्याचा मुलगा वसुलीसाठी सरकारी योजनांची तपासणी करतो. नितीशकुमार यांनी बिहार राज्याची चेष्टा चालवली आहे. 

दरम्यान, याआधी हाजीपुर येथील सरकारी कार्यक्रमामध्ये मंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले होते. पण या कार्यक्रमात सरकारी गाडीतून त्यांचे बंधू दाखल झाले होते. त्यानंतर त्यांची मंत्र्यांप्रमाणे बडदास्त ठेवण्यात आल्याचे समोर आले होते. या प्रकारावरून विरोधकांनी मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली होती. 

मुकेश साहनी हे पशु संवर्धन मंत्री आहेत. काही दिवसांपूर्वी मत्स्य विभागाचा सरकारी कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम साहनी यांच्या उपस्थितीत होणार होता. पण त्यांनी या कार्यक्रमासाठी आपल्या भावाला प्रतिनिधी म्हणून पाठविले होते. कार्यक्रमात लाभार्थ्यांना विविध साहित्याचे वाटप केले जाणार होते. पण मंत्र्यांचे बंधून संतोष साहनी हे विभागाच्या सरकारी गाडीतून तिथे पोहचले. त्यांच्याच हस्ते लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच संतोष यांना मंत्र्यांप्रमाणे सर्व सुविधा देण्यात आल्या होत्या. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com