`बीएचआर` प्रकरणी चर्चेतील `महा`नेता बारामतीत भेटीसाठी? : राष्ट्रवादीचे नेते म्हणतात... - big leader in link with bhr scam reached to baramati but ncp leader says | Politics Marathi News - Sarkarnama

`बीएचआर` प्रकरणी चर्चेतील `महा`नेता बारामतीत भेटीसाठी? : राष्ट्रवादीचे नेते म्हणतात...

कैलास शिंदे
बुधवार, 9 डिसेंबर 2020

आमचे नेते असल्या नेत्यांना थारा देणार नसल्याचा राष्ट्रवादीचा दावा

जळगाव : ‘बीएचआर ’पतंसस्था गैरव्यहवार प्रकरणाची चौकशी सुरू आहे. यातील काही जणांना अटकही करण्यात आली आहे. मात्र यातील चर्चेत असलेला एक नेता बारामतीला भेट देण्यास गेला होता. मात्र त्याला भेट मिळाली नसल्याची सांगण्यात येत आहे.  आमचे नेते अशा कोणालाही भीक घालणार नाहीत, असा  टोला राष्टवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री डॉ,सतीश पाटील यांनी लगावला आहे. ते जळगावात पत्रकारांशी बोलत होते.

आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले, कि, बीएचआर प्रकरणात चर्चेत असलेला एक जण बारामती येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना भेटावयास गेल्याचे माध्यमातून आलेल्या बातमीत आपल्याला समजले, तो नेता किंवा व्यक्ती कोण आहे, हे मला माहिती नाही. मात्र आमच्या नेत्यांनी त्यांना भेट दिली नसल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र हे वृत्त खरेच असेल तर आमचे नेते अशा कोणत्याही नेत्याला व व्यक्तीला भीक घालणार नाहीत हे आपण खात्रीपूर्वक सांगू शकतो. आमचे नेते कोणालाही पाठीशी घालणार नाहीत जे काही असेल ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ते समोर येईलच. याप्रकरणात राज्यातील माजी सरकारमधील मंत्री असल्याची चर्चा होती, व तेच बारामतीत भेट घेण्यास गेल्याचेही सांगण्यात येत होते.

मागील सरकारने प्रकरण दडपले
‘बीएचआर’अनेकांच्या ठेवी आहेत. त्यातील ठेवीदारांना त्यांची रक्कम मिळालेली नाही असे सांगून ते म्हणाले, कि आता ठेवीदारांच्या पावत्यातच गैरव्यवहार करण्यात आला आहे. मागच्या सरकारने हे प्रकरण दडपले, मात्र आमच्या सरकारने या प्रकरणी आता कारवाई सुरू केलीआहे. यातील काही जणांना अटकही केली आहे. मात्र यातील बीएचआर पंतसंस्थेचा अवसायक जितेंद्र कंडारे व सुनील झंवर हे फरार आहेत. यांना पोलिसांनी लवकरात लवकर अटक करण्याची गरज आहे. हे दोन्ही सापडले तर यांची मुख्य म्होरक्याही सापडेल. त्यामुळ या प्रकरणी त्वरीत कारवाई करावी या मागणीसाठी आपण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र देणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. यातील ठेवीदारांच्या ठेवीच्या रकमा परत मिळण्याची गरज आहे. असे मतही त्यांनी व्यक्त केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख