State Song News : 'जय जय महाराष्ट्र माझा' गीताला का मिळाला राज्यगीताचा दर्जा? कुणी लिहिले हे गीत..

Cabinet Meeting : शाहीर साबळे कोण होते?
Jai Jai Maharashtra maza
Jai Jai Maharashtra mazaSarkarnama

Maharashtra State Song News : 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत राज्यगीत म्हणून घोषीत करण्यात आले आहे. आज (दि.31 जानेवारी) झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तर काही दिवसांपूर्वी 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत राज्यगीत म्हणून घोषीत करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सांगितले होते.

आज (दि.31 जानेवारी) अखेर या निर्णयाला राज्याच्या कॅबीनेटने मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत या पुढे राज्याचे अधिकृत राज्यगीत असणार आहे. सध्या देशातील 11 राज्यांचे स्वत:चे गाणे आहे. यामध्ये आता महराष्ट्राचे देखील स्वत:चे गीत असणार आहे.

Jai Jai Maharashtra maza
Maharashtra Politics : अनिल परबांचा म्हाडाला वकिली हिसका; नियमांवर बोट ठेवत विचारले 'हे' प्रश्न

आता कार्यक्रमाच्या सुरुवातीला हे गाणे गायले जणार आहे. तसेच राष्ट्रगीतानेच संबंधित कार्यक्रमाची सांगता होईल, असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. तर या गीताचा इतिहास काय आहे? हे गाणे कोणी लिहले? तसेच हे गीत केव्हा गायले गेले? तसेच या गीताला आत्ता राज्यगीताचा दर्जा का देण्यात आला? याविषीयी सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घेऊयात..

Jai Jai Maharashtra maza
Chinchwad By Election : पहिल्या दिवशी पाटी कोरी; एकही उमेदवारी अर्ज चिंचवडला दाखल नाही

हे गीत कोणी लिहले आणि गायले?

'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत कवी राजा बढे यांनी लिहिलेले आहे. कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांनी हे गीत गायलेले आहे. तसेच श्रीनिवास खळे यांनी या गीताला संगीत दिलेले आहे.

1 मे 1960 ला महाराष्ट्राची निर्मिती झाली. यावेळी मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात शाहीर साबळे यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्यासमोर हे गीत गायले होते.

Jai Jai Maharashtra maza
Jalna Political News : घनसावंगीत टोपे, घाटगेंच्या सौभाग्यवतीही उतरल्या मैदानात..

'जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा' हे गीत उत्साह आणि प्रेरणा देणारे गीत आहे. या गीताच्या शब्दांमध्ये देखील एक उर्जा आहे. त्यामुळे आता राज्याचे अधिकृत राज्यगीत असणार आहे. सध्या देशातील 11 राज्यांचे स्वत:चे गाणे आहे. यामध्ये आता महराष्ट्राचे देखील स्वत:चे गीत असणार आहे.

शाहीर साबळे कोण होते?

मराठी शाहीर आणि लोकनाट्य कलावंत अशी शाहीर साबळे यांची ओळख होती. संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत शाहीर म्हणून शाहीर साबळे यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी ’गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले. शाहीर साबळे यांना पद्मश्रीसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com