रामराजे आणि शिवेंद्रराजे यांचे संगनमत - उदयनराजे भोसले

 रामराजे आणि शिवेंद्रराजे यांचे संगनमत - उदयनराजे भोसले

नवी दिल्ली : रामराजे निंबाळकर आणि शिवेंद्रराजे यांचे संगनमत झाले असून माझ्याबद्दल ते चुकीचे आरोप करत आहेत, मी पाणीप्रश्‍नाबाबत योग्य तेच आणि लोकहिताच्या दृष्टीने बोललो, त्यांना पक्षातून कुठे जायचे असेल तर त्यांनी जावे, त्यासाठी मला जबाबदार धरू नये त्यांची कुठेतरी सेंटीग झाली असेल असा घणाघाती आरोप साताऱ्याचे खासदार आणि छत्रपती शिवरायाचे वंशज उदयनराजे भोसले यांनी केला. देशाच्या राजधानीत ते आले असताना एका खासगी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. 

उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर यांच्यातील वाद मिटवण्यासाठी काल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रयत्न केला पण त्या बैठकीतून उदयनराजे मध्येच उठून गेले आणि त्यांनी रामराजे यांच्यावर जोरदार टीका केली. आज त्यांनी राजधानीत पत्रकारांशी बोलताना रामराजे यांच्यावर टीकेचे आसूड ओढतानाच आपले बंधू शिवेंद्रराजे आणि पक्षातील अन्य नेत्यांवरही कडवड टीका केली. मी काहीही चुकीचे बोलत नसून घटनेने मला जो बोलण्याचा अधिकार दिला आहे त्यानुसार मी बोलत आहे. मी आता घटनेच्या प्रती विकत घेतो आणि माझ्यावर टीका करणाऱ्या या मंडळींना वाटतो म्हणजे त्यांना घटनेची माहिती होईल असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी मारला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com