काँग्रेस अन् शिवसेनेच्या दोन 'भाईं'ची आमदारकी धोक्यात

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि शिवसेनेचे भाई म्हणजे माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे विधान परिषद सदस्यपद धोक्यात आले आहे.
bhai jagtap and ramdas kadam may not be elected again as mla
bhai jagtap and ramdas kadam may not be elected again as mla

मुंबई : मुंबई महापालिकेतून (BMC) विधान परिषदेवर (Legislative Assembly) निवडून जाणाऱ्या दोन जागांसाठी डिसेंबरमध्ये निवडणूक होणार आहे. सध्याच्या संख्याबळानुसार या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार निवडून येणे अवघड आहे. त्यामुळे मुंबई काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांचे विधान परिषद सदस्यपद धोक्यात आले आहे. याचबरोबर शिवसेनेचे (Shivsena) भाई म्हणजे माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनाही पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. 

मुंबई महापालिकेतून शिवसेनेचे रामदास कदम आणि भाई जगताप हे विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. नगरसेवकांच्या सदस्यसंख्येवरून या सदस्यांची निवड केली जाते. या निवडणुकीत 77 नगरसेवकांनी पहिल्या पसंतीचे मत दिल्यानंतर सदस्याचा थेट विजय होतो. काँग्रेसचे संख्याबळ 29 आहे. त्यामुळे काँग्रेससाठी स्वत:चा सदस्य निवडून आणणे अशक्य बनले आहे. त्यामुळे पक्षाच्या मुंबई अध्यक्षांचीच विधिमंडळातील खुर्ची धोक्यात आली आहे. 

काँग्रेसला आपला सदस्य निवडून आणायचा झाल्यास 48 नगरसेवक फोडावे लागतील. महापालिकेतील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता एवढे नगरसेवक फोडणे अवघड आहे. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार निवडून येणे शक्य नाही. भाई जगताप यांच्याबरोबरच शिवसेनेचे रामदास कदमही सलग दोन वेळा मुंबई महापालिकेतून निवडून गेले आहेत. परंतु, गेल्या विधान परिषद निवडणुकीपासून शिवसेनेने कदम यांना बाजूला फेकल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांना तिसऱ्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही. 

मुंबई महापालित भाजपचे 83 नगरसेवकांचे संख्याबळ आहे. त्यामुळे महापालिकेतून विधान परिषदेवर भाजपचा उमेदवार आरामात निवडून जाऊ शकतो. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा विजय नक्की असून, विधान परिषदेतील त्यांचे संख्याबळही वाढणार आहे. याचवेळी शिवसेनेकडे 97 नगरसेवक आहे. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवारही सहजपणे निवडून येईल. विधान परिषदेसाठी कोणाला उमेदवारी द्यायची, यावर शिवसेनेचा अद्याप निर्णय झालेला नाही. या वेळी शिवसेनेकडून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय सहकाऱ्याला प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com