कृषी कर्ज माफीबाबत भागवत कराडांनी संसदेत स्पष्टच सांगितलं... - Bhagwat Karad said in Parliament that farmers will not get loan waiver-rm82 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

कृषी कर्ज माफीबाबत भागवत कराडांनी संसदेत स्पष्टच सांगितलं...

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 जुलै 2021

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर 1 लाख 53 हजार 698 रूपयांच्या कर्जाचा बोजा आहे.

नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांवरील थकित कृषी कर्जाचा आकडा जवळपास 17 लाख कोटी रूपयांपर्यंत वाढला आहे. त्यातच कोरोना महामारी, पुर, वादळांसारखी नैसर्गिक आपत्ती या कारणांमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करणे शक्य होणार आहे. याअनुषंगाने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी गुरूवारी संसदेत महत्वाची माहिती दिली. (Bhagwat Karad said in Parliament that farmers will not get loan waiver)

कृषी कर्जाबाबतच्या एका प्रश्नावर उत्तर देताना कराड यांनी कृषी कर्ज माफीचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे सांगितले. शेतकऱ्यांवर एकूण 17 लाख कोटींहून अधिक कर्ज असून त्यापैकी सुमारे 10 लाख कोटी रुपयांचे कर्ज सात राज्यांतील शेतकऱ्यांवर आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचाही समावेश आहे. एकट्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर 1 लाख 53 हजार 698 रूपयांच्या कर्जाचा बोजा आहे, अशी माहिती कराड यांनी दिली.

हेही वाचा : चौपदरीकरणाच्या कामाला गडकरींनी मान्यता दिली अन् खासदार कोल्हे-बारणेंमध्ये जुंपली

सर्वाधिक कृषी कर्ज थकलेल्या सात राज्यांत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. तसेच गुजरातमधील शेतकऱयांची कृषी कर्ज थकबाकीही 90 लाख कोटींच्या पुढे आहे. देशातील फक्त कृषी कर्जाच्या थकबाकीचा आकडा 16 लाख 80 हजार कोटी रूपये एवढा आहे. अंदमान निकोबारसारख्या छोट्या केंद्रशासित  प्रदेशातही 10 लाख 91 हजार 954 शेतकऱयांकडे तब्बल 4 हजार 834 कोटींची थकबाकी आहे. 

कृषी कर्जाची मोठी थकबाकी असलेल्या राज्यांत तमिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक ही राज्य वरच्या क्रमांकावर आहेत. पण ही थकबाकी वसूल करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून कोणते उपाय केले जात आहेत, याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आलेली नाही. 

सर्वाधिक कृषी कर्ज थकबाकी असलेली राज्य (कोटी रूपयांमध्ये)

1. तामिळनाडू - 1,89,623
2. आंध्र प्रदेश - 1,69,322
3. उत्तर प्रदेश - 1,55,743
4. महाराष्ट्र - 1,53,698
5. कर्नाटक - 1,43,365
6. राजस्थान - 1, 20,979
7. मध्य प्रदेश - 1, 00,000

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख