आबासाहेबांच्या निधनाने पोरक्या झालेल्या शेकापचा महाआघाडीच्या नेत्यांपुढे कस लागणार

उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत जुळलेल्या नव्या समीकरणांमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
ganpatrao deshmukh-shahaji patil-deepak salunkhe
ganpatrao deshmukh-shahaji patil-deepak salunkheSarkarnama

सांगोला (जि. सोलापूर) : सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय हालचालींना आता वेग आला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव ऊर्फ आबासाहेब देशमुख यांच्या निधनामुळे पक्ष नेतृत्वाअभावी पोरका झाला आहे. पक्षात नेतृत्वाची एक प्रकारे पोकळी निर्माण झाली आहे. देशमुखांच्या निधनानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने ती ‘शेकापसाठी अस्तित्वाची, तर महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची’ असणार आहे. ही नगरपरिषदेची निवडणूक तालुक्याला नवी राजकीय दिशा देणारी ठरणार आहे. त्यातच उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत जुळलेल्या नव्या समीकरणांमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. (Battle for PWP's existence in the municipal elections in Sangola)

विधानसभा निवडणुकीनंतर सांगोला तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, हेच सध्या तालुक्यात दिसून येत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाने नगर परिषदेची निवडणूक एकत्रितपणे लढविण्याची घोषणा केली आहे. नगर परिषदेच्या गत निवडणुकीत पत्नी लोकनियुक्त नगराध्यक्षा व स्वतःही नगरसेवक असलेले आनंदा माने यांनी विधानसभेच्या निवडणुकीनंतर आमदार शहाजी पाटील यांची सोबत सोडून शेतकरी कामगार पक्षासोबत जाणार असल्याची घोषणा केली आहे.

ganpatrao deshmukh-shahaji patil-deepak salunkhe
डच्चू दिल्यानंतर वरूण गांधींचा विरोधी सूर; म्हणाले, राजकीय स्वार्थासाठी...

उपनगराध्यक्षपदाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपला महाविकास आघाडीने साथ दिली आणि शेकापला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वेगवेगळी राजकीय समीकरणे तयार झाली आहेत. त्यातच ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शेकाप प्रथमच निवडणुकीला सामोरे जाणार आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या गेल्या वेळच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेले आज काहीजण हातात-हात घालून युतीची, आघाडीची घोषणा करताना दिसत आहेत.

दोस्ती फिस्कटली

विधानसभा निवडणुकीच्या अगोदर (स्व.) गणपतराव देशमुख आणि माजी आमदार दीपक साळुंखे हे सर्वच कार्यक्रमात, निवडणुकीत एकत्रित असत. पण, विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी शेकापविरोधात भूमिका घेत आमदार शहाजी पाटील यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. तसेच, नगरसेवक आनंदा माने व जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार हे विधानसभेच्या निवडणुकीत शहाजीबापूंना आमदार करण्यासाठी प्रयत्न करणारे दोघेही आज आमदार पाटील यांची साथ सोडून शेकाप पक्षासोबत दोस्ताना केला आहे.

ganpatrao deshmukh-shahaji patil-deepak salunkhe
कर्तृत्वाने ठरले शिवाजीराव पंडित बीडच्या राजकारणातील `भीष्माचार्य`

व्यक्तीकेंद्रीत समीकरणे जुळणार

नुकत्याच झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने शेकापला पदापासून दूर ठेवण्यासाठी भाजपच्या उमेदवाराला साथ देऊन निवडूनही आणले. त्यामुळे नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत भाजपची भूमिका काय असेल, हे पाहवे लागणार आहे. पक्षीय राजकारणाबरोबरच व्यक्तीकेंद्रित युती, आघाडीचे समीकरणेही जुळणार का? याबाबत चर्चा सुरू आहे.

महाआघाडीच्या नेत्यांपुढे शेकापच्या नेतृत्वाचा कस लागणार

या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमधील शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील, राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे व काँग्रेसचे प्रांतिक सदस्य प्रा. पी. सी. झपके ह्या दिग्गज नेत्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची निवडणूक पार पडणार आहे. दुसरीकडे (स्व.) आबासाहेबांनंतर शेकापच्या नेतृत्वाचा खरा कस लागणार असून अस्तित्व निर्माण करण्यासाठी ही निवडणूक कसोटीची ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com