मुलांच्या लग्नातील गर्दीवर आमदार राऊत म्हणाले, तर लाखभर लोक आले असते!

कोरोनाविषयक निर्बंध असतानाही बार्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र राऊत यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचे धुमधडाक्यात लग्न केले होते.
barshi mla rajendra raut says he does not invited people for sons marriage
barshi mla rajendra raut says he does not invited people for sons marriage

सोलापूर : कोरोनाविषयक (Covid) निर्बंध (Lockdown) असतानाही बार्शी (Barshi) विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचे धुमधडाक्यात लग्न केले होते. या प्रकरणी मोठा गदारोळ झाल्यानंतर यावर आमदार राऊत यांनी खुलासा करीत भूमिका मांडली आहे. 

मुलांच्या लग्नाला झालेल्या गर्दीबाबत माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की,  लग्नाच्या पत्रिकाही मी छापल्या नव्हत्या. देवासमोर ठेवण्यासाठी आणि मुंबईतील काही मित्रांना देण्यासाठी काही पत्रिका आणल्या होत्या. पण हे निमंत्रण व्हॉट्स अॅपवर व्हायरल सगळीकडे पोचले. लोकांनी घरूनच आशीर्वाद द्यावेत, अशी विनंती मी केली होती. पण लग्नाला आलेल्या लोकांना माघारी पाठवता येत नाही.

पत्रिका व्हायरल झाल्यानंतर लग्नाला येणाऱ्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही तयारी केली होती. कोरोनामुळे आम्ही सर्वतोपरी काळजी घेतली होती. राजकारणी म्हटले की लोक शुभकार्याला येतात. मी गेली 30 वर्षे राजकारणात आहे. लग्नाला आलेल्या लोकांची गैरसोय केली असती तरी आम्हाला नावे ठेवली असती. न बोलावताही लग्नाला 5 ते 7 हजार लोक आले. आता कोरोनाचा प्रादुर्भाव नसता तर लाखभर लोक आले असते, असे राऊत यांनी स्पष्ट केले. 

कोरोना निर्बंधामुळे सोलापुरात सायंकाळी चार वाजता सार्वजनिक कार्यक्रमांना मनाई आहे. सोलापूर जिल्ह्यात सायंकाळी चारनंतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. याचबरोबर शनिवार- रविवारी संपूर्ण दिवस निर्बंध आहेत. या नियमांना नियमांचे उल्लंघन करुन आमदार राजेंद्र राऊत यांनी दोन्ही मुलांचा जंगी विवाह सोहळा केला. या विवाह सोहळ्याप्रकरणी आधी आयोजक योगेश पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.  

बार्शीतील लक्ष्मी सोपान बाजार समितीचे आमदार राऊत हे अध्यक्ष आहेत. त्यांची मुले रणजीत आणि रणवीर यांचा विवाह 25 जुलैला सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी थाटामाटात झाला होता. या विवाह सोहळ्याला हजारो नागरिक उपस्थित होते. या सोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यात आले नव्हते. याचबरोबर अनेकांनी मास्क  घातल नव्हते. आमदार राजेंद्र राऊत हे भाजप समर्थक असल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे अनेक आमदार आणि पदाधिकारी या विवाह सोहळ्याला उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com