भाजप सोडणाऱ्या नेत्यानं अखेर खासदारकीवरही सोडलं पाणी!

सुप्रियो यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. त्यांनी भाजप सोडल्यानंतर महिनाभराने आज खासदारकीचा राजीनामा दिला.
Babul Supriyo with Narendra Modi
Babul Supriyo with Narendra ModiFile Photo

कोलकता : माजी केंद्रीय मंत्री व पश्चिम बंगालमधील (West Bengal) खासदार बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांनी नुकताच भाजपला (BJP) धक्का देत तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना डच्चू देण्यात आल्यानं ते नाराज होते. त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. आता त्यांनी भाजपच्या तिकिटावर मिळालेली खासदारकीही सोडली आहे.

सुप्रियो यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. त्यांनी भाजप सोडल्यानंतर महिनाभराने आज खासदारकीचा राजीनामा दिला. यानंतर बोतलाना सुप्रियो भावुक झाले होते. ते म्हणाले की, माझे मन आज भरून आले आहे. माझी राजकीय कारकिर्द मी भाजपमधून सुरू केली. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे प्रमुख जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानतो. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला होता. मी स्वत:हून राजकारण सोडले आहे. मी आता पक्षाचा भाग नसल्याने लोकसभेची जागा माझ्याकडे ठेवू शकत नाही.

Babul Supriyo with Narendra Modi
शशिकलांचं 'कमबॅक' अन् तमिळनाडूचे माजी आरोग्यमंत्री अडचणीत

सुप्रियो यांनी नुकताच तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश केला. भाजप सोडून तृणमूलमध्ये प्रवेश करणारे ते पाचवे नेते ठरले होते. त्यांच्या आधी 4 भाजप आमदारांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. सुप्रियो यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाचे राज्यमंत्रिपद होते. त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. यानंतर दोनच महिन्यांत त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश करुन भाजपला धक्का दिला.

Babul Supriyo with Narendra Modi
दिवाळी होणार गोड! पेट्रोल, डिझेल स्वस्त होण्याची शक्यता

बाबुल यांनी काल ट्विट करून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा सोपवणार असल्याची माहिती दिली होती. खासदार दाचा राजीनामा सोपवण्यासाठी ओम बिर्ला यांनी आज सकाळी 11 वाजताची वेळ घेतली आहे. आता मी भाजपमध्ये नसल्याने खासदारांना मिळणारे वेतन व इतर सुविधांचा लाभ मी घेऊ शकत नाही. ही जागा मी भाजपकडून जिंकलो होतो. मी जागा पुन्हा जिंकेन, असे बाबुल सुप्रियो यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com