बी. एस. येडीयुरप्पा यांना एकनाथ शिंदेंचे खरमरीत पत्र..  - B. S. To YeddyurappaLetter from Eknath Shinde  | Politics Marathi News - Sarkarnama

बी. एस. येडीयुरप्पा यांना एकनाथ शिंदेंचे खरमरीत पत्र.. 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 29 ऑगस्ट 2020

मंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा याना खरमरीत पत्र लिहिले आहे. 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील पिरणवाडी गावातील मराठी भाषकांवर कर्नाटक पोलिसांकडून झालेला अन्यायकारक हल्ला प्रकरण सीमा भाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा याना खरमरीत पत्र लिहिले आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाचे दैवत आहेत. मराठी भाषक विरुद्ध कन्नड भाषक वाद निर्माण होऊ देऊ नका, यापूर्वीच मनगुत्ती घटनेवरून महाराष्ट्रातील शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. पिरणवाडी - मनगुत्ती सारख्या घटना घडवून आणणाऱ्या कन्नड संघटनावर योग्य कार्यवाही करा, अशी मागणी एकनाथ शिंदे यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
 

पिरणवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर कन्नड भाषक संघटनेकडून स्वातंत्रसैनिक संगोली रायन्ना यांचा पुतळा उभारण्यात येत आहे. रायन्ना यांचा पुतळा उभारण्यास मराठी भाषकांचा विरोध नाही. पण जाणीवपूर्वक शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर रायन्ना यांचा पुतळा उभारण्यात येत आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चैाकाचे नाव बदलण्याचा प्रयत्न केला जाते आहे. हे प्रकार कन्नड भाषक संघटनेकडून केले जात आहे. यामुळे कन्नड व मराठी भाषक असा वाद निर्माण झाला आहे. 

 

याविषयावर आवाज उठविणाऱ्या मराठी भाषकांवर काल पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे, या प्रकरणाचा मंत्री एकनाथ शिंदे यांनी निषेध केला आहे. मराठी भाषक व कन्नड भाषक असा पेटणार नाही, यांची काळजी कर्नाटक सरकारने घ्यावी, असे पत्र शिंदे यांनी कर्नाटकांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. 

हेही वाचा: उद्धवा तुझा कारभारच धुंद; आज साई मंदिरासमोर आंदोलन
 
नागपूर : राज्यातील देवस्थाने, धार्मिक स्थळे सरकारने सुरू करावी, यासाठी संत, महंत, आचार्य, धर्माचार्य, धार्मिक, अध्यात्मिक व सांप्रदायिक क्षेत्रातील मंडळी तसेच देवस्थाने, तीर्थक्षेत्रे यांवर ज्यांचा उदरनिर्वाह निगडीत आहे, ते व्यावसायिक उद्या आंदोलन करणार आहेत. शहरातील साई मंदिरासमोर भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके सकाळी ११ वाजता आंदोलन सुरू करतील. ‘मदिरा चालू मंदिर बंद, उद्धवा तुझा कारभारच धूंद’, असे या घंटानाद आंदोलनाचे स्वरूप राहणार आहे. सामाजिक अंतर आणि नियमांसह राज्यातील देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करून भजन कीर्तन व पूजनास परवानगी मिळावी. या मागणीकडे निद्रिस्त ठाकरे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उद्या सकाळी ११ वाजता राज्यात सर्वत्र देवस्थाने, मंदिरे, धार्मिक स्थळांसमोर 'घंटानाद आंदोलन' करणार आहेत. 'दार उघड उद्धवा दार उघड', 'दारू नको भक्तीचे दार उघड', 'मदिरा चालू मंदिर बंद, उद्धवा तुझा कारभारच धुंद', 'भक्तांना जेल, गुन्हेगारांना बेल', असे या घंटानाद आंदोलनाचे स्वरूप असणार आहे. या घंटानाद आंदोलनास महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख