बलात्कार पिडीत राष्ट्रीय खेळाडूच्या 'त्या' ऑडिओ क्लिपवरून नराधमाला बेड्या

बलात्कार पिडीत 24 वर्षीय तरूणीचा मृत्यू झाला असून ती खो-खोची राष्ट्रीय खेळाडू होती.
बलात्कार पिडीत राष्ट्रीय खेळाडूच्या 'त्या' ऑडिओ क्लिपवरून नराधमाला बेड्या
Audio clip records Uttar Pradesh kho kho players rape

लखनऊ : नोकरीसाठी एकाठिकाणी मुलाखत देऊन ती घरी परत निघाली होती. यावेळी ती आपल्या मित्राशी फोनवर बोलत असतानाच रेल्वे स्थानकातील  एका कामगारानं तिला अडगळीच्या ठिकाणी ओढून नेलं. ती बराच वेळ मदतीचा धावा करत होती, पण काही वेळानं तिचा आवाज बंद झाला. मित्राच्या फोनमध्ये हा आवाज रेकॉर्ड झाला होता. नराधम तिथून पळून गेला व पण याच ऑडिओ क्लिपमुळं पोलिसांनी त्याला गजाआड केलं आहे. 

उत्तर प्रदेशातील बिजनोर येथे 10 सप्टेंबर रोजी ही घटना घडली आहे. बलात्कार पिडीत 24 वर्षीय तरूणीचा मृत्यू झाला असून ती खो-खोची राष्ट्रीय खेळाडू होती. तिचा मृतदेह रेल्वे स्थानकाजवळ सापडल्यानंतर पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी विशेष पथक तयार केलं होतं. आरोपीनं तिचीच ओढणी आणि दोरीनं गळा आवळून खून केला. पण त्यापूर्वी ती मदतीसाठी जोरदारात ओरडत होती. यावेळी तिचा फोन सुरूच असल्यानं तिचा आवाज रेकॉर्ड झाला. तिच्या मित्रानं पोलिसांना ही क्लिप दिली. 

शहजाद उर्फ हदीम असं या आरोपीचं नाव आहे. तिचा खून केल्यानंतर तो मोबाईल घेऊन पसार झाला. घरी गेल्यानंतर त्यानं मोबाईल बंद केला. पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन अटक केली. तिच्या आवाजातील क्लिपच्या आधारे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी आणखी महत्वाचे पुरावे मिळाले आहेत. 

आरोपी विवाहित असून त्याला एक मुलगीही आहे. त्याला अंमली पदार्थांचं व्यसन आहे. स्थानि पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधाच चार गुन्हे दाखल आहेत. रेल्वे स्थानकातून वस्तू चोरल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तरूणीच्या खूनाचा गुन्हा पूर्वी रेल्वे पोलिसांकडे दाखल होता. त्यानंतर तो बिजनोर पोलिसांकडे हस्तांतरीत करण्यात आला. तीन दिवसांतच हा प्रकरणाचा छडा लावल्याबद्दल पोलिस अधिक्षक धरमवीर सिंग यांनी तपास करणाऱ्या पोलिसांच्या टीमला 25 हजार रुपयांचं बक्षिस जाहीर केलं आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in