आसामचे मुख्यमंत्री म्हणतात, मुस्लिमांनी लोकसंख्या नियंत्रणात ठेवावी - assam chief minister himanta biswa sarma says muslims should adapt family planning | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

आसामचे मुख्यमंत्री म्हणतात, मुस्लिमांनी लोकसंख्या नियंत्रणात ठेवावी

वृत्तसंस्था
शनिवार, 12 जून 2021

मुस्लिमांनी लोकसंख्या नियंत्रणात ठेवावी, असे विधान करुन आसामचे मुख्यमंत्री हिमंत विश्‍व सरमा यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. 

गुवाहाटी : मुस्लिमांनी (Muslim) लोकसंख्या (Population) नियंत्रणात ठेवावी, असे विधान करुन आसामचे (Assam) मुख्यमंत्री हिमंत विश्‍व सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. आधीच सामाजिक ध्रुवीकरणाचा आरोप राज्यात भाजपवर होत असताना मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे गदारोळ उडाला आहे. 

आसाममधील तीन जिल्ह्यांतील सरकारी जमिनीवरील अतिक्रमण हटविल्यानंतर निर्माण झालेला वाद हा मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचे कारण असल्याचे समोर आले आहे. स्थलांतरित मुस्लिमांनी कुटुंब नियोजन धोरणाचा स्वीकार करावा, असे आवाहन मुख्यमंत्री सरमा यांनी केले आहे. देशातील दारिद्य्र कमी करण्यासाठी कुटुंब नियोजन अतिशय महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दारिद्र्य दूर करण्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी पुढाकार घेत सरकारला या कामी मदत करावी, असेही आवाहनही त्यांनी केले आहे. लोकसंख्येचा विस्फोट कमी करण्यासाठी मुस्लिमांसोबत काम करण्यासही तयार असल्याचे त्यांनी नमूद केले. 

हेही वाचा : राजस्थानमध्ये राजकीय संकट; पायलट पुन्हा एकदा दिल्लीत दाखल 

आसाममधील सरकारला तीस दिवस पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त विधाने केली. २०११ च्या जनगणनेनुसार आसाममध्ये एकूण लोकसंख्येपैकी मुस्लिमांची संख्या ३४.२२ टक्के आहे. अनेक जिल्हे हे मुस्लिमबहुल असून, ख्रिश्‍चनांचे प्रमाण ३.७४ टक्के आहे. शीख, बौद्ध आणि जैन या अन्य अल्पसंख्याकांचे प्रमाण हे 1 टक्क्यापेक्षाही कमी आहे. काही दिवसांपूर्वी येथील सरकारी जमिनीवर अल्पसंख्याकांनी केलेले हटवण्यात आले. 

या कारवाईबद्दल बोलताना सरमा म्हणाले की, मंदिरांच्या जमिनीवर होणारे अतिक्रमण राज्य सरकार कदापी खपवून घेणार नाही. जंगल असो वा अन्य जागा त्याच्याशी लोकांच्या भावना जोडलेल्या असतात. राहण्यायोग्य जागा कमी होऊ लागली की सरकारी जमिनींवर अतिक्रमण होऊ लागते. राज्य सरकारने अतिक्रमण हटविले म्हणून टीका करण्यापेक्षा विविध समाजघटकांनी आधी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. मुस्लिम महिलांमध्ये जनजागृती करुन कुटुंब नियोजन वाढवावे यासाठी सरकार या समुदायाच्याबरोबर काम करेल.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख