Chinchwad By-Election : राहुल कलाटेंमुळे अश्विनी जगतापांचा विजय झाला सोपा; भाजपचा नैतिक पराभवच

Chinchwad By Election Result : कलाटेंमुळे काटेंचा विजय हुकून जगतापांचा चौकार बसला, पतीच्या जागेवर पत्नीच्या विजयाची प्रथा चिंचवडने ठेवली कायम
Ashwini Jagtap, Nana Kate, Rahul Kalate
Ashwini Jagtap, Nana Kate, Rahul KalateSarkarnama

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीचा (भाजप) विजय हा आघाडीतील बंडामुळे (ठाकरे गटाचे राहूल कलाटे यांची बंडखोरी) झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण कलाटे व आघाडी उमेदवाराची (राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे) एकूण मते ही भाजपच्या विजयी उमेदवारापेक्षा (अश्विनी जगताप) काही हजारांनी जास्त आहेत.

भाजप जेवढ्या मतांनी चिंचवडला विजयी झाली आहे, त्यापेक्षा अधिक मते ही आघाडीतील बंडखोर कलाटेंनी घेतल्याने हा भाजपचा सहज आणि निखळ विजय म्हणता येणार नाही. उलट तो त्यांचा व त्यांचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचाही नैतिक पराभव आहे.

कारण कसब्यात, तर भाजप पराजित झाली असून चिंचवडला त्यांना विजय हा आघाडीतील बंडखोरीमुळे मिळाला आहे. तर, तेथील आघाडीचा विजय हा कलाटेंनी हिरावून घेतला, असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही.

Ashwini Jagtap, Nana Kate, Rahul Kalate
Chinchwad By Election Result : ...म्हणून तर निवडणुकीत पैशांचा वापर; काटेंनी स्पष्टच सांगितलं कारण

गतवेळपेक्षा यावेळी भाजपचे मताधिक्य कमी झाले आहे, हे ही लक्षात घेतले पाहिजे. तरीही हा विजय आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्य़ा दृष्टीने भाजपसाठी बूस्टर डोस आहे.

कारण या विजयाचे भांडवल ते पालिका निवडणुकीत करणार यात वाद नाही. तर, या पराभवाने गतवेळी २०१७ ला पिंपरी पालिकेतील गेलेली १५ वर्षाची सत्ता पु्न्हा आणण्यासाठी राष्ट्रवादीची वाट आणखी बिकट झाली आहे.

नवख्या व अननुभवी अश्विनी जगताप यांचा विजय हा थोडीशी सहानुभूतीची आणि दिवंगत आ.लक्ष्मणभाऊंच्या कामाचा आहे, हे मान्य करावे लागेल. विजयी उमेदवारांनीही त्याची कबुल दिली आहे. यानिमित्त काटेंना २०१४ नंतर पुन्हा पराभवाचे तोंड पहावे लागले. तर, कलाटेंना अतिआत्मविश्वास नडला.

Ashwini Jagtap, Nana Kate, Rahul Kalate
Sharad Pawar News: राऊतांसाठी पवार मैदानात; हक्कभंग समितीबाबत उपस्थित केले प्रश्न

गतवेळी २०१९ ला एक लाख १२ हजार मते घेतल्याने यावेळी विजयी होऊ, असा दावा त्यांनी केला होता. पण, त्यांना पन्नास हजारही मते मिळाली नाहीत. म्हणजे गतवेळची त्यांची मते ही राष्ट्रवादीने त्यांना दिलेल्या पाठिंब्यातून मिळाली होती, हे स्पष्ट झाले आहे. त्यातून यावेळी त्यांच्या पराजयाची हॅटट्रिक झाली आहे.

नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत दिसलेला प्रस्थापितविरोधातील कल (अॅन्टी इन्कंबन्सी) विधानसभेच्या या पोटनिवडणुकीत जनतेने स्पष्टपणे दिल्याचे कसबा पेठमध्ये अधोरेखित झाले. चिंचवडलाही त्यांनी असाच कौल दिला होता.

पण, आघाडीला तो तिथे कसब्याप्रमाणे घेता आला नाही. बंडखोराला आवरणे त्यांना जमले नाही. परिणामी हातातोंडाशी आलेला त्यांचा विजय हिरावला गेला तो त्यांच्यातील बंडखोरीमुळे. त्यातूनच कलाटेंनी काटेंचा काटा काढल्याची चर्चा या निकालानंतर चिंचवडमध्ये ऐकायला मिळाली.

Ashwini Jagtap, Nana Kate, Rahul Kalate
Kasba By-Election : फडणवीस-पटोलेंमध्ये रंगली टोलेबाजी : 'धंगेकरांना जागा करावी लागेल' ; फडणवीस म्हणाले, 'एक जागा...'

आघाडीतील बंडखोरीमुळे चिंचवडला जगतापांचा चौकार बसला. कारण हवेली या राज्यातील सर्वात मोठ्या विधानसभा मतदारसंघाचे २००९ ला विभाजन होऊन पिंपरी, चिंचवड आणि भोसरी असे तीन मतदारसंघ निर्माण झाले.

त्यातील चिंचवडचे पहिले, दुसरे व आताचे तिसरे आमदारही लक्ष्मण जगतापच होते. त्यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली आणि त्यातही जगतापच म्हणजे त्याच्या पत्नी अश्विनी या आज विजयी झाल्या.

२००९ ला जगताप हे अपक्ष, तर त्यानंतर २०१४ आणि २०१९ ला ते भाजपकडून चिंचवडमध्ये निवडून आले होते. तर, आता २०२३ ला पुन्हा जगतापच विजयी झाल्याने या मतदारसंघाचे आतापर्यंतचे सर्व आमदार हे जगतापच व त्यातही जगताप दांपत्यच राहिले आहे. पतीच्या निधनानंतर रिक्त जागी पत्नीला उमेदवारी दिली, तर हमखास विजय मिळतो, ही राज्याच्या पोटनिवडणुकीतील प्रथा चिंचवडने पुढे चालू ठेवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com