एकनाथ खडसे अडचणीत; पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात अटक वॅारंट जारी

कर्ते करविते कोण आहेत आणि भोगायला कोणाला लागतंय?
एकनाथ खडसे अडचणीत; पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात अटक वॅारंट जारी
Eknath Khadsesarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पिंपरी-चिंचवडमधील भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळ्या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळत अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. या जमीन व्यव्हार घोटाळा प्रकरणात मंदाकिनी खडसे आरोपी आहेत.

मंदाकिनी खडसे यांनी अटक पूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने सदर अर्ज फेटाळला आहे. याच प्रकरणात एकनाथ खडसे यांना न्यायालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, खडसे न्यायालयात हजर होऊ शकले नाही. खडसेंची सर्जरी झाली असून ते सध्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भर्ती आहेत. अजूनही काही दिवस ते रुग्णालयातच राहणार आहेत. असे खडसे यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. तसेच न्यान्यालयात हजर रहन्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. न्यायालयाने खडसे ह्याना हजर राहण्यासाठी वेळ दिला आहे. ह्या प्रकरणात पुढील सुनावणी 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

Eknath Khadse
दसरा मेळाव्यात पंकजा उत्स्फूर्तपणे बोलणार...पण निशाण्यावर कोण राहणार?

खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. याबाबत मला वाईट वाटत कारण कर्ते करविते कोण आहेत आणि भोगायला कोणाला लागतंय? एकनाथ खडसे यांनी जे काम केले त्याचे परिणाम त्यांचा जावई आणि पत्नीला भोगावे लागत आहेत. दोघांना भोगावे लागतंय पण यातून मार्ग नक्कीच निघेल भ्रष्टाचार थोड्याच दिवसात पुढे येईल. एकनाथ खडसे रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत पण प्रत्येक नेते चौकशी पासून पळ काढण्यासाठी तब्येतीचा बहाणा सांगतात. सत्य लवकर समोर येईल, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

पुण्यातील भोसरी जमीन व्यवहारातील कथित घोटाळ्याप्रकरणी खडसे यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. मात्र, खडसे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावला.

Eknath Khadse
मोठी बातमी : फडणवीसांच्या अडचणी वाढल्या; तो खटला पुन्हा उभा राहणार

खडसे यांच्या पत्नी आणि जावाई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी एमआयडीसी येथील सव्‍‌र्हे क्र. ५२/२ अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली होती. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची नोंद केली. एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या आणि त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत. या व्यवहारात सुमारे ६१ कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाले असून हा मोठा गैरव्यवहार असल्याचा ईडी ला संशय आहे.

Related Stories

No stories found.