Martand Devsthan Jejuri : जेजुरीत बाहेरच्या विश्वस्तांचा अट्टहास कोणाचा आणि कुणाच्या आशीर्वादाने?; माजी मंत्र्याची शिफारसही डावलली

गावकऱ्यांचा बाहेरच्या लोकांना विश्वस्त मंडळावर घेण्यास विरोध नाही. पण किमान ५० टक्के विश्वस्त हे जेजुरीतील असावेत, असा गावकऱ्यांचा आग्रह आहे.
Jejuri Martand Devsthan
Jejuri Martand Devsthan Sarkarnama

पुणे : जेजुरीच्या खंडोबा गडाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या मार्तंड देवस्थान समितीच्या विश्वस्त मंडळामध्ये स्थानिकांना डावलून सत्ताधाऱ्यांनी आपल्या मर्जीतील लोकांना संधी दिली आहे. या विश्वस्त मंडळातील तिघे वगळता इतर चौघे हे पुरंदर तालुक्याबाहेरील आहेत. सत्ताधारी पक्षाचा हा डाव गावकऱ्यांच्या वर्मी लागला असून या विश्वस्तांच्या विरोधात त्यांनी आंदोलनास्त्र उगारले आहे. सत्ताधाऱ्यांशी संबंधित लोकांचीच नियुक्ती करायची होती, तर जेजुरीतील भाजप कार्यकर्त्यांचा विचार का झाला नाही. मार्तंड देवस्थान समितीवर बाहेरील व्यक्तींची निवड कोणाच्या आशीर्वादाने झाली आणि तो हट्ट कुणाचा, असा सवाल जेजुरीकर विचारत आहेत. (Appointment of trustees of Martand Devasthan in Jejuri will be challenged in court)

दरम्यान, जेजुरीतील (Jejuri) नागरिकांनी गेल्या चार दिवसांपासून चक्री उपोषण सुरू केले आहे. आज बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, पुरंदरचे (Purandhar) आमदार संजय जगताप, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी उपोषकर्त्यांची भेट घेतली आहे. काहींनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर हा विषय घातला आहे. हा विषय विधानसभेत उपस्थित करण्याचा शब्दही विरोधी पक्षनेत्यांनी दिला आहे. दुसरीकडे, गावकऱ्यांनीही उच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Jejuri Martand Devsthan
Dimbhe Dam Water Issue : डिंभे धरणाचे पाणी पळविल्यास सर्वप्रथम मी अन्‌ आमदार बेनके जेलमध्ये जाऊ : दिलीप वळसे पाटील यांचा इशारा

गेल्या आठवड्यात मार्तंड देवस्थानवर सात जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यातील मंगेश अशोक घोणे हे एकटेच जेजुरीचे रहिवासी, तर पोपट सदाशिव खोमणे आणि विश्वास गोविंद पानसे हे पुरंदर तालुक्यातील आहेत. बाकीचे चौघे तालुक्याबाहेरील पुणे जिल्ह्यातील आहेत. मार्तंड देवस्थानच्या विश्वस्तपदासाठी जेजुरीतील ३५० लोकांनी मुलाखती दिल्या होत्या. त्यातून फक्त घोणे यांनाच संधी दिली आहे. इतरांमध्ये अभिजित अरविंद देवकाते, राजेंद्र बबन खेडेकर, अनिल रावसाहेब सौंदडे, पांडुरंग ज्योतिबा थोरवे यांचा समावेश आहे.

Jejuri Martand Devsthan
Ramdas Athawale News: नागालॅंडमध्ये दोन आमदार निवडून येतात; पण महाराष्ट्रात ताकद असूनही का येत नाहीत : आठवलेंची खंत

गावकऱ्यांचा बाहेरच्या लोकांना विश्वस्त मंडळावर घेण्यास विरोध नाही. पण किमान ५० टक्के विश्वस्त हे जेजुरीतील असावेत, असा गावकऱ्यांचा आग्रह आहे. कारण, खंडोबा गडावर वर्षभरात आठ मोठ्या यात्रा भरतात. यात सोमवतीच्या दोन यात्रा, चंपाषष्टी उत्सवाचा समावेश आहे. वर्षभरात साजरे होणारे उत्सव, यात्रा यांमध्ये जेजुरी ग्रामस्थ, मानकरी मंडळासह पुजारी आणि सेवेकरी मंडळाचा सहभाग असतो, त्यामुळे स्थानिक पुजारी आणि सेवेकरी वर्गातील एकाला विश्वस्त मंडळात स्थान देण्याची मागणी होत आहे. रुढी, परंपरा, यात्रा, जत्रांमधील बारीकसारीक माहिती बाहेरच्या विश्वस्तांना नसते. ऐनवेळी काय घडले तर गावकऱ्यांनाच धावपळ करावी लागते, त्यामुळे स्थनिक विश्वस्त किमान ५० टक्के असावेत, असा गावकऱ्यांचा आग्रह आहे.

Jejuri Martand Devsthan
RPI Session in Shirdi: ‘अशा लोकांमुळेच पार्टीचा सत्यानाश झालाय’; घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला आठवलेंनी झाप झापले

गावकऱ्यांचा आणि रुढी-परंपराचा विचार न करताच सत्ताधारी पक्षाने आपल्या मर्जीतील लोकांना विश्वस्त म्हणून जेजुरीकरांच्या माथी मारले आहे. या विश्वस्तांच्या माध्यमातून मंदिरावर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केल्याचे दिसून येते. हे सर्व सत्ताधारी पक्ष आणि त्यांची मातृसंस्थेशी निगडीत आहेत. विशेष म्हणजे राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या पक्षाच्या एका माजी मंत्र्याने केलेली शिफारसही डावलण्यात आली आहे, त्यामुळे ह्या निवडी कोणाच्या आशीर्वादाने झाल्या, हे स्पष्ट होते.

Jejuri Martand Devsthan
Eknath Shinde News : अहिल्यादेवी आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटविण्याच्या वादावर मुख्यमंत्र्यांचे प्रथमच भाष्य

या विश्वस्तांच्या निवडी कशाच्या आधारावर केल्या. सहधर्मादाय आयुक्तांच्या माध्यमातून होणाऱ्या निवडीतही सत्ताधाऱ्यांचा आक्षेप होणार असेल तर मुलाखती आणि अर्ज मागविण्याचा फार्स का करण्यात आला, असा जेजुरीकरांचा सवाल आहे.

पुढे काय?

बाहेरील व्यक्तींच्या नियुक्तीविरोधात जेजुरीत अगडोंब उसळला आहे. सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत चक्री उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून आज उपोषणाचा चौथा दिवस आहे. जागरण गोंधळ, भजनाच्या माध्यमातून या नियुक्तींचा निषेध करण्यात येत आहे. येत्या २५ जूनपर्यंत चक्री उपोषणाची तयारी झालेली आहे. दुसऱ्या बाजूने कायदेशीर लढा देण्याचाही निर्धार केला आहे. त्या दृष्टीने उच्च न्यायालयात जाण्याची तयारीही चालवली आहे. राजकीय पातळीवर या निवडी रद्द करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. त्याचपद्धतीने सहधर्मदाय आयुक्तांनाही या निवडी मागे घेण्याचा अधिकार असल्याचा दावा काही जाणकर करत आहेत. त्यातून काय मार्ग निघू शकतो, हे पाहणे महत्वाचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com