अनुप्रिया पटेल यांचे कमबॅक! ओबीसी मतांवर डोळा ठेवून मोदींची खेळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार झाला आहे. यात अपना दलाच्या अनुप्रिया पटेल यांना स्थान देण्यात आले आहे.
apna dal leader anupriya patel inducted in union cabinet
apna dal leader anupriya patel inducted in union cabinet

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार झाला आहे. उत्तर प्रदेशातील भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या अपना दलाच्या (Apna Dal) नेत्या अनुप्रिया पटेल  (Anupriya Patel) यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदींनी हा निर्णय घेतला आहे. पटेल यांच्या रुपाने ओबीसी समाजाला खूष करण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. 

पटेल या मिर्झापूरच्या खासदार असून, त्या कुर्मी समाजातील आहेत. त्या 2014 मध्येही मोदींच्या मंत्रिमंडळात होत्या. उत्तर प्रदेशात भाजपने 2014 मध्ये 80 पैकी 71 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी अपना दलानेही दोन जागा जिंकल्या होत्या. परंतु, त्यांच्या पक्षाला मोदींच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते. अनुप्रिया पटेल यांचे कमबॅक आता झाले आहे. 

पटेल यांच्याकडे वाणिज्य व उद्योग राज्यमंत्रिपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्या आधी महिला व बाल कल्याण विभागाच्या राज्यमंत्री होत्या. राज्यातील जातीय समीकरणात या समाजाचे महत्व आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होत असून, त्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाला भाजपकडे ओढून घेण्याची खेळी भाजपने खेळली आहे. उत्तर प्रदेशात यादवांनतर कुर्मी हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा ओबीसी समाज आहे. 

मागील महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी पटेल यांची भेट घेतली होती. उत्तर प्रदेशातील भाजपच्या सहकारी पक्षांसोबत शहांची खलबते सुरू आहेत. याच भेटीत पटेल यांनी दोन केंद्रीय मंत्रिपदांची मागणी केली होती. मागील काही दिवसांपासून पटेल या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर नाराज असल्याची चर्चाही सुरू होती. मागील वर्षी अपना दलाने आघाडीतून बाहेर पडण्याची धमकी दिली होती. भाजपकडून सहकारी पक्षांची काळजी घेतली जात नसल्याचा आरोप अपना दलाने केला आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com