शिवसेनेचे चाणक्य मानले जाणारे बसले कोपऱ्यातील खुर्चीवर!

Anil Parab हे ठाकरे सरकार सत्तेतून गेल्यापासून निरीक्षकाच्या भूमिकेत
Anil Parab
Anil Parab Sarkarnama

मुंबई : राजकारणातील फासे कधी बदलतील, हे कळत नाही. ठाकरे सरकारमध्ये नेहमीच प्रकाशझोतात राहणारी मंडळी आता चुकूनच पुढे येताना दिसत आहेत. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे माध्यमांमध्ये शिवसेनेचा किल्ला लढवायचे. तर अनिल परब (Anil Parab) हे सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांचे उजवे हात मानले जात होते. ठाकरे यांच्याकडून कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याआधीची सारी छाननी ही अनिल परब यांनी केलेली असायची. त्यांनी `ग्रीन सिग्नल` दिल्यानंतरच ठाकरे हे स्वाक्षरी करायचे, असे तेव्हा बोलले जात होते. त्यातही आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या किंवा अन्य महत्वाच्या फाईलवर परब यांचे मत महत्वाचे असायचे.

Anil Parab
Nitesh Rane : जास्त मस्ती कराल तर... नितेश राणेंचा इशारा

ठाकरे सरकार गेल्यापासून शिवसेनेचा आक्रमक चेहरा संजय राऊत हे तुरुंगात गेले आहेत. माध्यमांचा किल्ला लढवायची जबाबदारी अरविंद सावंत आणि विनायक राऊत यांच्यावर आली आहे. अधुनमधून अनिल देसाई हे पण बोलत असतात. पण अनिल परब मात्र फारसे भाष्य करत नाहीत. परब यांना त्यांच्या रिसाॅर्टच्या मुद्यावरून भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अडचणीत आणले आहे. त्यातही परब यांच्यावर आज किंवा उद्या कारवाई होणार, असे सोमय्या अधुनमधून सांगत असतात. परिणामी या साऱ्या संघर्षात परब यांनी थेट जाहीर भाष्य केले नाही.

परब हे मुरब्बी नेते असताना त्यांना पक्षाने दुसरा झटका दिला. पहिल्यांदाच आमदार झालेल्या अंबादास दानवे यांना पक्षाने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद दिले. स्वतः परब हे या पदावर जाण्यासाठी इच्छुक होते की नाही, याची कल्पना नाही. मात्र हे पद मिळाले असते तर त्यांनी ते थोडेच नाकारले असते? पण तेथेही त्यांच्या पदरी निराशा आली.

Anil Parab
संजय राठोडांना पूर्ण शह देण्याची रणनीती : स्वतः उद्धव ठाकरे पोहरादेवीला जाणार?

परब हे किती साईडलाईनला गेले आहेत, त्याचे दृश्य आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिसून आले. अजितदादांनी सरकारवर त्यांच्या नेहमीच्या शैलीत टीका केली. विधानसभेतील विरोधी नेते बोलल्यानंतर साहजिकच विधान परिषदेतील विरोधी नेते म्हणून दानवे यांना संधी मिळाली. व्यासपीठावर या वेळी सहा नेते. राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि एकनाथ खडसे यांनी हजेरी लावली. काॅंग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि भाई जगताप हजर होते. सेनेकडून दानवे आणि परब होते. पण परब हे एकदम कडेच्या खुर्चीवर बसले होते. एखाद्या पत्रकार परिषदेत अशी खुर्ची मिळाली म्हणून कोणी लगेच डावलले गेले आहे, असे होत नाही. पण गेल्या 45 दिवसांतील परब यांचा पडद्यासमोर न येणे लक्षात येते. त्यामुळे त्यांनीच सध्या फार आक्रमक भूमिका न घेता अलिप्त राहण्याचे ठरवले आहे की पक्षाने त्यांना तसे सांगितले आहे, हे आता विधीमंडळाच्या अधिवेशनातच कळेल. विधान परिषदेच्या सभागृहात परब कसे सरकारवर तुटून पडणार की शांत राहणार, याची उत्सुकता राहील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com