देशमुखांचे तत्कालीन खाजगी सचिव संजीव पलांडे निलंबित

महसूल विभागाकडून गुरूवारी पलांडे यांच्या निलंबनाचा आदेश काढण्यात आला आहे.
Anil Deshmukhs private secretary Sanjeev Palande suspended
Anil Deshmukhs private secretary Sanjeev Palande suspended

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे तत्कालीन खाजगी सचिव व अपर जिल्हाधिकारी संजीव पलांडे यांना राज्य शासनाने गुरूवारी निलंबित केले. मनी लाँर्डिंग प्रकरणात त्यांची चौकशी सुरू असून सध्या ते कोठडीत आहेत. पोलीस कोठडीतील कालावधी 48 तासांपेक्षा जास्त झाल्याने 26 जूनपासून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. (Anil Deshmukhs private secretary Sanjeev Palande suspended)

महसूल विभागाकडून गुरूवारी पलांडे यांच्या निलंबनाचा आदेश काढण्यात आला आहे. पलांडे यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ता. 26 जून रोजी अटक केली आहे. त्यांना त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली. ही माहिती संचालनालयाने ता. 31 ऑगस्ट रोजी पत्राद्वारे कळवली आहे. पलांडे यांचा पोलिस कोठडीतील कालावधी 48 तासांपेक्षा अधिक आहे, असं आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

पलांडे यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) मधील तरतुदीनुसार अटकेच्या दिनांकापासून म्हणजेत ता. 26 जूनपासून निलंबित झाल्याचे मानण्यात आले आहे. त्यामुळं ते पुढील आदेश काढेपर्यंत निलंबित राहतील, असं आदेशात स्पष्ट कऱण्यात आलं आहे. 

दरम्यान, पलांडे यांच्यासह देशमुख यांचे सहायक कुंदन शिंदे यांच्याविरोधात ईडीने काही दिवसांपूर्वीच दोषारोपपत्र दाखल केलं आहे.  देशमुखांबरोबरच त्यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे आणि असिस्टंट कुंदन शिंदे यांचा मोठा सहभाग असल्याचा आरोप आहे. या दोघांवर बार मालकांकडून पैसे गोळा केल्याचा आरोप आहे.
  

मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी एक पत्र लिहून अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचे लक्ष्य दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ईडीने याप्रकरणी माजी पोलीस निरीक्षक सचिन वाझेची देखील चौकशी केली. अनिल देशमुख यांनी पैशांचा गैरवापर केला, असा ईडीला संशय आहे. त्यातूनच ईडीने देशमुख यांच्याघरावर छापा मारला होता. त्यानंतर त्यांच्या स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि स्वीय सचिव संजीव पलांडे यांना अटक केली होती.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com