‘नन्हे पटोले’ म्हणत अमृत फडणवीसांनी घेतला नानांचा समाचार!

नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे.
Amrita Fadnavis criticizes Nana Patole
Amrita Fadnavis criticizes Nana Patolesarkarnama

मुंबई : ‘सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले...!’ अशा शायराना अंदाजात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेतला आहे. (Amrita Fadnavis criticizes Nana Patole)

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी भंडाऱ्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने नागरिकांशी बोलताना ‘आपण मोदींना शिव्या देऊ शकतो...आपण मारू शकतो...’ असे विधान केले होते. त्यावरून भारतीय जनता पक्षाने रान उठवले आहे. त्या वादात आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उडी घेतली आहे. त्यांनी शेरोशायरीच्या माध्यमातून पटोले यांचा समाचार घेतला आहे.

Amrita Fadnavis criticizes Nana Patole
मोदींना मारण्याची भाषा करणाऱ्या पटोलेंच्या प्रतिमेला भाजपने मारले जोडे!

अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सूरज को डुबाने का इरादा रखते है, कुछ नन्हे पटोले! पर इल्म नहीं है उन्हें के इस प्रगति की रोशनी को बुझाने की होड़ में, खुद ही जल जाएँगे ये लाइलाज फफोले! पटोले यांच्यासारखे छोटे नेते सूर्याला बुडवायचे इरादे राखून आहेत. मात्र, प्रगतीच्या या प्रकाशाला विझवण्याच्या प्रयत्नात ते स्वतःच जळून खाक होतील, अशा शब्दांत अमृता यांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे.

Amrita Fadnavis criticizes Nana Patole
रिक्षातून SP ऑफिसमध्ये पोचला अन्‌ म्हणाला ‘मी विशाल फटे...’ : पोलिसांनीच ओळखले नाही!

पटोलेंच्या या विधानावरून संपूर्ण राज्यात भाजपने रान पेटवले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांपासून स्थानिक कार्यकर्त्यापर्यंत सर्वजण पटोले यांच्या विरोधात पेटून उठला आहे. काहींना त्यांच्या प्रतिमेचे दहन केले आहे, तर काही ठिकाणी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना ज्या न्यायाने अटक करण्यात आली, त्याच न्यायाने नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, नाना पटोले यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून असे म्हटलेले नाही, तर गावातील मोदी नावाच्या गुंडाबाबत बोलत हेातो. तेथील लोकांनी त्याबाबत माझ्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधताना आपण मोदींना शिव्या देऊ शकतो, मारू शकतो, असे म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com