मोठी बातमी : कोरोना महामारीतही मोदी सरकारकडून ऑक्सिजनची निर्यात दुप्पट

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. देशात रुग्णसंख्या वाढत असताना ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
amid covid 19 crisis india exports double amount of oxygen
amid covid 19 crisis india exports double amount of oxygen

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत सुमारे 3 लाख नवीन रुग्ण सापडले असून, 2 हजार 23 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात अनेक ठिकाणी रुग्णांचा ऑक्सिजनवाचून तडफडून मृत्यू होत आहेत.  मात्र, देशात कोरोना संकट असतानाही मोदी सरकारकडून ऑक्सिजनची निर्यात दुपटीने झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

वाणिज्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मागील आर्थिक वर्ष 2020-21 मधील पहिल्या दहा महिन्यांतील ऑक्सिजनची निर्यात ही त्याआधीच्या संपूर्ण आर्थिक वर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे. विशेष म्हणजे कोरोना संकटाच्या काळात केंद्र सरकारकडून ऑक्सिजनची निर्यात दुपटीहून अधिक वाढली आहे. एप्रिल 2020 ते जानेवारी 2021 या काळात भारताची ऑक्सिजन निर्यात 9 हजार 301 टन आहे. यातून देशाला 8.9 कोटी रुपये मिळाले आहेत. याउलट आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये देशाची ऑक्सिजन निर्यात 4 हजार 514 कोटी रुपये होती आणि यातून 5.5 कोटी रुपये मिळाले होते.  

कोरोना रुग्णांची प्रकृती ढासळल्यास त्यांच्यावर उपचार करण्यात वैद्यकीय ऑक्सिजन अतिशय महत्वाचा असतो. देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्ण दगावल्याचे प्रकारही घडले आहेत. दिल्लीतील रुग्णालयात केवळ काही तासांचा ऑक्सिजन शिल्लक असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. 

रुग्णसंख्या आणि मृत्यूचे आकडे वाढतेच 
आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 2 लाख 95 हजार रुग्ण सापडले. यामुळे देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 21 लाखांवर गेली आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या सलग 42 व्या दिवशी वाजढली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 21 लाख 57 हजार 538 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 13.82 टक्के आहे. याचवेळी बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होऊन ते 85.01 टक्क्यावर आले आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 56 लाख 16 हजार 130 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख 82 हजार 553 झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 32 लाख 76 हजार 39 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.17 टक्के आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 7 ऑगस्ट 20 लाख, 23 ऑगस्ट 20 लाख, 5 सप्टेंबर 40 लाख, 16 सप्टेंबर 50 लाख अशी वाढत गेली. त्यानंतर 28 सप्टेंबर 60 लाखस 11 ऑक्टोबर 70 लाख, 29 ऑक्टोबर 80 लाख, 20 नोव्हेंबर 90 लाख आणि 19 डिसेंबर 1 कोटी अशी वाढत गेली. देशातील कोरोना रुग्णसंख्या 19 एप्रिलला दीड कोटींवर गेली. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com