प्रदेशाध्यक्ष अन् मुख्यमंत्र्यांच्या भांडणाचा काँग्रेसलाच होणार फायदा!

पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यामुळे पक्षाची डोकेदुखी वाढली आहे.
amarinder singh and navjot singh sidhu dispute will be beneficial
amarinder singh and navjot singh sidhu dispute will be beneficial

नवी दिल्ली : पंजाब (Punjab) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्यामुळे पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. सिद्धू यांनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांच्या विरोधात उघड बंड पुकारले होते. त्यामुळे काँग्रेस (Congress) हाय कमांडने सिद्धूंना प्रदेशाध्यक्षपदी बढती दिली होती. तरीही वाद सुरूच असून आहे. या वादाचा पक्षाला फायदाच होईल, असा अजब दावा पंजाब प्रभारी हरीश रावत यांनी केला आहे. 

रावत म्हणाले की, मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात कोणताही वाद नाही. त्यांच्यात वाद असेल तर त्याचा भविष्यात पक्षाला फायदाच होईल. या दोन्ही शूर नेत्यांनी ठामपणे त्यांची मते सर्वांसमोर मांडली आहेत. पंजाब ही वीरांची भूमी आहे. येथील लोक अतिशय ठामपणे आपली मते मांडतात. त्यामुळे आपल्याला वाटते की ते दोघे भांडत आहेत. प्रत्यक्षात तसे काही घडत नसते. पंजाब काँग्रेसच अंतर्गत वादावर तोडगा काढत आहे. आम्हाला काही करायची आवश्यकताच नाही. या दोन्ही नेत्यांमध्ये काही वाद झाल्यास तो काँग्रेससाठी चांगलाच ठरेल. 

प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हाती घेताच सिद्धू यांनी चार सल्लागारांची नेमणूक केली होती.  त्यापैकी प्यारेलाल गर्ग व मलविंदर माली यांनी नुकतेच वादग्रस्त वक्तव्य केले होते. माली यांनी मागील आठवड्यात काश्मीरबाबत वादग्रस्त वक्तव्य करून पक्षाला अडचणीत आणले होते. तर गर्ग यांनी थेट अमरिंदरसिंग यांनी पाकिस्तानवर केलेल्या टीकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. दोन्ही सल्लागारांची वक्तव्य समोर आल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. 

पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनी सल्लागारांवरून सिद्धू यांना तंबी दिली होती. ते म्हणाले होते, सल्लागारांच्या विधानांना संपूर्ण पक्ष आणि राज्याचा आक्षेप आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, ही पक्षाची भूमिका आहे. हे सल्लागार पक्षाने नेमलेले नाहीत. त्यांना काढून टाकण्यासाठी आम्ही सिद्धू यांना सूचना केलेली आहे. त्यांनी असे न केल्यास आम्ही सल्लागारांची हकालपट्टी करू. पक्षाला अडचणीत आणणारे लोक आम्हाला नको आहेत. 

यानंतर सिद्धू यांचे सल्लागार मलविंदरसिंग माली यांनी राजीनामा दिला होता. नंतर सिद्धू यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्या. मला हे स्वातंत्र्य मिळाल्यास पुढील दोन दशके राज्यांत काँग्रेसला वाढवेन. नाहीतर मी कुणालाच सोडणार नाही, असे सिद्धू यांनी म्हटले होते. सिद्धू यांनी एकप्रकारे पक्षनेतृत्वालाच आव्हान दिले होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com