मंदिरात प्रवेश द्या..नाहीतर, महाद्वारावर मोर्चा : आंबेडकरांचा इशारा  - Allow entry to the temple : Prakash Ambedkar | Politics Marathi News - Sarkarnama

मंदिरात प्रवेश द्या..नाहीतर, महाद्वारावर मोर्चा : आंबेडकरांचा इशारा 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 31 ऑगस्ट 2020

सरकारने भक्तांचा अंत न पाहता मंदिर प्रवेशास परवानगी द्यावी, असं मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. 

सोलापूर : नागरिकांच्या धर्म स्वातंत्र्यासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरली आहे, त्यामुळं राज्य आणि केंद्र सरकारने भक्तांचा अंत न पाहता मंदिर प्रवेशास परवानगी द्यावी, असं मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. 

दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे पंढरपूर मंदिर प्रवाश आंदोलन हे शांततेच्या मार्गाने असणार आहे, त्यामुळे सरकारने किती ही पोलीस फौज फाटा उभा केला आणि मंदिरात प्रवेश जरी नाही दिला तर वंचितचं आंदोलन हे पंढरपूर विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराला जाऊन धडकणार आहे, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी आज सोलापूरमध्ये व्यक्त केलं.

"विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी खुले करावे, अशी मागणी विश्व वारकरी संघटनेसह बहुजन वंचित आघाडाने केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने 22 मार्च पासून विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले आहे. गेल्या सहा महिन्यापासून बंद असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर पुन्हा भाविकांना दर्शनासाठी खुले करावे, अशी मागणी बहुसंख्य वारकरी संघटनांसह बहुजन वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. 

विश्व वारकरी संघटनेचे अध्यक्ष अरूण महाराज बुरघाटे यांनी मंदिर दर्शनासाठी खुले करावे, अन्यथा वारकरी मंदिरात जावून दर्शन घेतील, असा इशारा दिला आहे तर वारकरी पाईक संघटनेने मात्र संख्यात्मक आंदोलनाला आपला पाठिंबा  नसल्याचे सांगत, वारकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होऊ नये, असे आवाहन केले आहे. सध्या पितृ पक्ष पंधरवाडा सुरू होत आहे. त्यामुळे अधिक महिन्याच्या पहिल्या दिवसापासून मंदिर दर्शनासाठी खुले करावे, अशी भूमिकाही त्यांनी  मांडली आहे. मंदिर खुले करावे या मागणीवरूच वारकरी संघटनामध्येच दोन मतप्रवाह समोर आले आहेत. राज्य सरकार मंदिर उघडण्याबाबत आता कोणता निर्णय घेणार याकडेच वारकरी व भाविकांचे लक्ष लागले आहे.

 Edited  by : Mangesh Mahale

हेही वाचा : प्रकाश आंबेडकरांनी मुख्य न्यायाधीशांना केली ही विनंती  पुणे : शेड्युल कास्ट व शेड्युल ट्रायलच्या आरक्षणामध्ये आरक्षण असले पाहिजे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयावर मांडले आहे. मात्र हे मत मांडताना आरक्षण कसे असले पाहिजे, कसे झाले पाहिजे त्याला कसला आधार पाहिजे, यावर काहीच चर्चा झाली नाही, त्यामुळे या विषयावर नागरिकांचे मत जाणून घेतले पाहिजे हे मत घटनात्मक आहे की नाही हे न्यायालयाने पहावे तोपर्यंत हे प्रकरण आहे तसेच ठेवावे अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना केली आहे. आरक्षणामध्ये आरक्षण असले पाहिजे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात मांडले आहे. मात्र, त्याला कसलाही आधार देण्यात आला नाही किंवा तो घटनात्मक आहे की नाही यावरही काहीही खुलासा न्यायालयाने न करता हे प्रकरण मुख्य न्यायपीठाकडे देण्यात यावे, असे सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख