नवे निर्बंध : उद्यापासून सकाळी 7 ते 11 दरम्यानच अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करता येणार

राज्यात निर्बंध लागू करुनही मोठ्या प्रमाणात नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसत आहे. यामुळे सरकारने हे निर्बंध आणखी कडक केले आहेत.
all grocery and vegetable shops will be open at 7 to 11 am from tomorrow
all grocery and vegetable shops will be open at 7 to 11 am from tomorrow

मुंबई : कोरोनाला अटकाव करण्यासाठी 5  ते 30 एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला होता. आता सरकारने हे निर्बंध आणखी कडक केले आहेत. उद्यापासून (ता.21) 1 मेपर्यंत भाजीपाला, किराणा आणि दूध दुकाने सकाळी 7 ते 11 याच वेळेत सुरू राहतील. याचबरोबर आणखी काही निर्बंध वाढवण्याचा विचार राज्य सरकार करीत असून, राज्याची वाटचाल आता संपूर्ण लॉकडाउनतच्या दिशेने सुरू झाली आहे.  

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज बैठक झाली. या बैठकीनंतर बोलताना टोपे म्हणाले की, सरकार आणखी निर्बंध वाढवण्याचा विचार करीत आहे. किराणा, फळे, भाजीपाला आणि दूध यासह इतर आवश्यक वस्तू विकणारी दुकाने आता सकाळी 7 ते 11 या चार तासातच खुली राहतील. 

राज्यात निर्बंध लागू करुनही मोठ्या प्रमाणात नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसत आहे. लोक किराणा, दूध आदी वस्तूंच्या खरेदीच्या नावाखाली दिवसभर फिरत असल्याचे चित्र आहे. आवश्यक वस्तूंची दुकाने सकाळी चार तास खुली ठेवण्याचा आदेश लवकरच काढण्यात आला आहे. 

नव्या आदेशानुसार असे असतील निर्बंध 
1. सर्व  किराणा दुकाने, भाजीपाला व फळ विक्रेत, दूध डेअरी, बेकरी, मिठाईची दुकाने सर्व प्रकारची खाद्यपदार्थांची दुकाने (चिकन, मटण, मासे आणि अंडी), कृषीविषयक दुकाने, पावसाळी साहित्याची दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेतच खुली राहतील. 
2. होम डिलिव्हरी सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहील. 
3. अत्यावश्यक सेवांना कोणतेही बंधन नसेल. 

दोन दिवसांत आणखी निर्बंध? 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत अनेक तज्ञांशी चर्चा करीत आहेत. राज्यातील निर्बंध आणखी वाढवण्याचा निर्णय ते दोन दिवसांत घेण्याची शक्यता आहे. राज्यात मागील 24 तासांत 58 हजार 924 रुग्ण सापडले आहेत. राज्यातील एकूम रुग्णसंख्या 38 लाख 98 हजार 262 वर पोचली असून, एकूण मृत्यू 60 हजार 284 आहेत. 

राज्यात सध्या 'ब्रेक द चेन'अंतर्गत शेतीविषयक कामे , सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच आहे. मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद आहेत. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात येत आहे.

राज्यात 144 कलम लागू करण्यात आले आहे.  सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. तसेच, रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येत नाही. यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com