काँग्रेसला तोंडावर पाडणाऱ्या बड्या नेत्यानं महिनाभरातच ममतांनाही दाखवला हिसका!

महिन्याच्या आतच अलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी तृणमूल सोडून ममता बॅनर्जींना तोंडावर पाडले आहे.
काँग्रेसला तोंडावर पाडणाऱ्या बड्या नेत्यानं महिनाभरातच ममतांनाही दाखवला हिसका!
Aleixo Reginaldo LourencoSarkarnama

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) रणधुमाळीत काँग्रेसकडून (Congress) तिकिट मिळताच कार्याध्यक्ष अलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स (Aleixo Reginaldo Lourenco) यांनी पक्षाला तोंडावर पाडले होते. त्यांनी तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा देऊन तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला होता. आता महिन्याच्या आतच त्यांनी तृणमूल सोडून ममता बॅनर्जींना (Mamata Banerejee) हिसका दाखवला आहे.

लॉरेन्स यांनी आता तृणमूल काँग्रेसचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांनी ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून राजीनामा दिला आहे. त्यात त्यांनी राजीनाम्याचे कोणतेही कारण स्पष्ट केलेले नाही. तृणमूलने लॉरेन्स यांच्या राजीनाम्याला दुजोरा दिला आहे. तृणमूलच्या गोवा प्रभारी महुआ मोईत्रा म्हणाल्या की, लॉरेन्स यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे पत्र आम्हाला मिळाले आहे. आम्ही लॉरेन्स यांच्यासह असंख्य नेत्यांना पक्षाचे दरवाजे खुले केले होते. आता त्यांना पक्षातून बाहेर पडण्याची इच्छा आहे. त्यांना आम्ही शुभेच्छा देतो.

Aleixo Reginaldo Lourenco
मोठी बातमी : आमदार नितेश राणेंना उच्च न्यायालयाचा दणका

लॉरेन्स यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसचे गोवा विधानसभेतील संख्याबळ दोनवर आले होते. लॉरेन्स हे दक्षिण गोव्यातील कुर्टोरीम मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांना विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवला होता. याचबरोबर काँग्रेसचाही त्यांनी राजीनामा दिला होता. नंतर त्यांनी कोलकत्यात जाऊन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश केला होता.

Aleixo Reginaldo Lourenco
परमबीरसिंह-वाझेमुळे उपनिरीक्षकासह चार पोलिसांच्या नोकऱ्या धोक्यात

लॉरेन्स यांच्या संपर्कात मागील काही दिवसांपासून भाजपचे नेते होते. परंतु, त्यांनी भाजपला नकार दिला होता. गोव्यामध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. काँग्रेसकडून जाहीर झालेल्या पहिल्या यादीत लॉरेन्स यांचा समावेश होता. लॉरेन्स यांना कुर्टोरीम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. परंतु, त्यांनी काँग्रेसला धक्का देत तृणमूलमध्ये प्रवेश केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.