Dhananjay Munde : अजितदादांनी सुनावताच धनंजय मुंडेंनी तो निर्णय बदलला...

आपण मधल्या काळात विनायक मेटे यांना गमावलं.
Ajit Pawar-Dhananjay Munde
Ajit Pawar-Dhananjay MundeSarkarnama

मुंबई : रात्रीचा प्रवास करण्यावरूनही विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहातील आमदारांचे कान टोचले. मधल्या काळात आपण विनायक मेटेंना (Vinayak Mete) गमावले आहे. परवा जयकुमार गोरे (Jaykumar Gore) असाच रात्रीचा प्रवास करत होते. आमचे धनंजय मुंडेही (Dhananjay Munde) रात्रीच चालले होते. त्यावेळी त्यांना शहाणपणा करा; रात्री बारा ते पहाटे तीन प्रवास करू नका, असे स्पष्ट शब्दांत सांगितले. तेव्हा कुठे ते थांबले, असेही पवार यांनी सांगितले. (As soon as Ajit Pawar suggested, Dhananjay Munde changed his decision to travel at night)

पुरवणी मागण्यांच्या प्रस्तावावर चर्चा करताना अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून गिरीश महाजन आणि चंद्रशेखर बावनकुळेपासून चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत सर्वांचे वाभाडे काढले. त्याचदरम्यान त्यांनी रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या आमदारांना शहाणपणाचे चार शब्द सुनावले.

Ajit Pawar-Dhananjay Munde
Pawar-Fadnavis : सरकार पाडण्याच्या फडणवीसांच्या ‘त्या’ खेळीची अजित पवारांनी केली पोलखोल

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘बारामती येऊन घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार,’ या वाक्याचा समाचार घेताना त्यांना म्हणावं जरा दमानं, दमानं घ्या. पण, गाडी एकदम फास्ट चाललीय. फास्ट गाडीचा कधी अपघात होईल, कोलमडून पडेल, हे कळायचं पण नाही, असे सांगितले. यात अपघाताचा संदर्भ आल्याने अजित पवार यांनी रात्रीच्या प्रवासाबद्दलही सांगितले.

Ajit Pawar-Dhananjay Munde
कोल्हापूरचा आमचा ढाण्या वाघ... म्हणत अजित पवारांनी चंद्रकांतदादांच्या जखमेवर मीठ चोळले

ते म्हणाले की, आपण मधल्या काळात विनायक मेटे यांना गमावलं. परवा आमदार जयकुमार गोरे यांनी विधानसभेत भाषणं केलं आणि रातोरात मतदारसंघ गाठण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वजण म्हणतो की रात्री बारा ते पहाटे तीनपर्यंत प्रवास नका करू. आमचे धनंजय मुंडेही रात्रीच चालले होते. मी त्यांना म्हटलं शहापणा करा आणि रात्री बारा ते तीन प्रवास करू नका. तेव्हा ते थांबले.

Ajit Pawar-Dhananjay Munde
अजितदादांचं बावनकुळेंना थेट आव्हान : 'मनावर घेतलं तर मीच त्यांचा करेक्ट कार्यक्रम करेन'

त्या दोन ते तीन तासांमुळे काय होणार आहे. आपण कितीही जागे राहिलो तरी ड्रायव्हरला कधी डुलकी लागेल हे कळतही नाही. पण कुणीतरी हे केलंलं आहे का अशा शंका-कुशंका घेतल्या जातात. प्रत्येकाला आयुष्यात जीव महत्वाचा आहे. रस्ते, महामार्ग एवढे चांगले झाले आहेत. पण नियमांचे पालन आपण केलं पाहिजे. आपण स्वतःहून काही बंधनं घालून घेतली पाहिजेत, अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in