चंद्रकांतदादा, आम्हीही खूप काही बोलू शकतो; पण... : अजितदादांनी सुनावले

सुप्रिया सुळेंवरील टीकेसंदर्भात अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांना दिले उत्तर
चंद्रकांतदादा, आम्हीही खूप काही बोलू शकतो; पण... : अजितदादांनी सुनावले
chandrakant patil-Ajit pawar-Supriya SuleSarkarnama

मुंबई : खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासंदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी अतिशय चुकीचे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्राची ती संस्कृती नाही. आम्ही पण खूप काही बोलू शकतो, पण आपल्या संस्कृतीचा विचार करुन गप्प बसतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी चंद्रकांत पाटील यांना सुनावले. (Ajit Pawar replied to Chandrakant Patil regarding the criticism on Supriya Sule)

आमदार पाटील यांनी बुधवारी खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून ‘मसणात जावे’ असे बोलले होते. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून चंद्रकांत पाटील यांना त्याच भाषेत उत्तर दिले जात आहे. राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, सक्षणा सलगर यांनी चंद्रकांत पाटलांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पत्रकार परिषदेत त्यावर भाष्य केले.

chandrakant patil-Ajit pawar-Supriya Sule
भरणेंसारखी जिगर सोलापुरातील नेते दाखवणार का?

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य त्यांच्या पक्षातील नेत्यांनाही पसंत पडले नसेल. राज्यात अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना असे नेते काहीही बोलून जातात आणि माध्यमात तेच दाखवले जाते. त्यामुळे राजकीय नेते, कार्यकर्त्यांनी तारतम्य ठेवून वक्तव्य केले पाहिजे. कुठलाही समाज किंवा महिला वर्गाच्या भावना दुखावल्या जातील, असे बोलता कामा नये, असे आवाहनही त्यांनी केले.

chandrakant patil-Ajit pawar-Supriya Sule
चंद्रकांतदादा तुम्हीही मसणात जाणारच आहात ना!

राज्यसभा निवडणुकीबाबत पवार म्हणाले की, राज्यसभेची निवडणूक जवळ येत असून ती बिनविरोध होईल, असे वाटत नाही. तसेच, संभाजीराजे यांनी खासदारकीबाबत सर्वच पक्षांशी चर्चा केली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडे अधिकची मते नसल्यामुळे आम्ही एकच जागा निवडून आणू शकतो, असे स्पष्टीकरणही पवार यांनी या वेळी दिले.

chandrakant patil-Ajit pawar-Supriya Sule
शिवसेनेचे दोन 'संजय' राज्यसभेत जाण्यासाठी सज्ज; 'मविआ'चे एकीचे दर्शन अन् शक्तीप्रदर्शन

केंद्रीय यंत्रणाकडून अधिकारांचा वापर करत कारवाया केल्या जातात. माझ्याही नातेवाईकांवर मागच्या काळात धाडी टाकल्या होत्या. मंत्री अनिल परब यांच्यावर आज कारवाई सुरु असल्याची माहिती काही लोकांनी दिली. मागे तर काही नेत्यांनी अमक्याचा नंबर, तमक्यावर कारवाई असे सूतोवाच केले होते आणि त्यानंतर त्या त्या व्यक्तींवर कारवाई झालेली आहे. अशा यंत्रणेमध्ये कुणाचाही हस्तक्षेप न होता पारदर्शकपणे कारवाई केली गेली तर कुणाचाही विरोध नाही. जसे राज्य सरकारच्या अखत्यारीत सीआयडी, ईओडब्ल्यू, लाचलुचपत विभाग आहे. त्यांना माहिती मिळाल्यानंतर ते कारवाई करतात. तसेच, केंद्रीय यंत्रणादेखील काम करतात. कायद्यानेच या यंत्रणांना अधिकार दिलेले आहेत. फक्त त्याचा गैरवापर होऊ नये, एवढीच सर्वांची अपेक्षा आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in