#AirIndiaCrash  : तर विमान दुर्घटना टळली असती....

विमानतळाच्या स्थानिक प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष होते. आता या सर्व प्रकाराची उच्च स्तरीय चैाकशी सुरू आहे.
airindia.jpeg
airindia.jpeg

नवी दिल्ली : कोझिकोड विमानतळावर झालेला विमान अपघात हा निष्काळजीमुळे झाला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या विमानतळावरील अनेक त्रुटींबाबत यापूर्वी डीजीसीएने विमानतळ प्रशासनाला नोटिस बजावली होती. पण विमानतळ प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होतं. जर त्रूटींकडे वेळीचं लक्ष दिले गेले असतं तर कालचा विमान अपघात झाला नसता, अशी माहिती समोर आली आहे. 

डीजीसीएने 4 आणि 5 जुलै 2019 रोजी कोझिकोड विमानतळाची पाहणी केली होती. त्यानंतर त्यांना अनेक त्रुटीं आढळल्या होत्या. याबाबत डीजीसीएने त्यांना नोटिसही बजावली होती. कोझिकोड विमानतळावरील धावपट्टीवर पाणी साचणे, चिखल होणे, कचरा जमा होणे आदी त्रुटीं डीजीसीएच्या तपासणी पथकाला आढळल्या होत्या. विमानतळाचा परिसर नियमानुसार नसल्याचेही या पथकाने विमानतळ प्रशासनाच्या लक्षात आणून दिले होते. पण या त्रुटीं दूर करण्यास विमानतळ प्रशासनाने कोणतेही प्रयत्न केले नाही. 

विमानतळाच्या स्थानिक प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष होते. आता या सर्व प्रकाराची उच्च स्तरीय चैाकशी सुरू आहे. ब्लॅक बॅाक्सची तपासणी होणार आहे. ब्लॅंक बॅाक्सला दिल्ली येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. याच्या तपासणीनंतर या अपघातास कोण जबाबदार आहे, हे लक्षात येईल. विमानतळावर पाणी साचल्यामुळे विमानाचा अपघात झाला असल्याचे प्राथमिक तपासात निष्षन्न झाले आहे. विमान अपघातातील जखमीच्या नातेवाईकांसाठी मुंबई आणि दिल्ली येथून दोन विमानं रवाना झाली आहेत.  

एअर इंडिया एक्स्प्रेसचे दुबईहून आलेले विमान काल रात्री कोझिकोड आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना कोसळले होते. यातील मृतांची सख्या 19 झाली आहे. यात दोन पायलटांचा समावेश आहे. 40 पेक्षा अधिक प्रवाशी गंभीर जखमी आहेत. अपघातात प्रवाशांचे जीव वाचविण्याचा प्रयत्न करणारे पायलट कॅप्टन दीपक साठे आणि कॅप्टन अखिलेश कुमार या दोघांचाही मृत्यू झाला आहे. दीपक साठे हे फायटर पायलट होते. ते पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)च्या 58 व्या तुकडीचे विद्यार्थी होते. 


वायु सेना अकादमीकडून स्वॉर्ड ऑफ ऑनर पुरस्कार प्राप्त कॅप्टन दिपक साठे यांनी मिग विमाने सर्वाधिक वेळा चालवली होती. त्यांनी आपला जीव गमावत अनेक प्रवाशांचे प्राण वाचविले आहेत. या अपघाताच्या वेळेस 10 लहान मुले, 184 प्रवाशी, दोन पायलट, चार विमान प्रशासनाचे कर्मचारी होते. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाकडून मदतकार्य वेगाने सुरू आहे. एनडीआरएफचे पथकही पोहचले आहे. याविषयी मल्लपुरमचे पोलीस अधीक्षक अब्दुल करीम म्हणाले की, दुर्घटनेतील जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी मदत कार्य सुरू आहे. 

ही दुर्घटना घडली त्यावेळी मुसळधार पाऊस पडत होता. या प्रकरणी केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. त्यांनी पोलिसांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. याचबरोबर मदत कार्य वेगाने करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन स्थितीचा आढावा घेतला आहे. कोझिकोड आणि मल्लपुरमचे जिल्हाधिकारी आणि पोलीस महानिरीक्षक अशोक यादव घटनास्थळी पोचले आहेत. 
Edited  by : Mangesh Mahale  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com