हवाई दलप्रमुख म्हणाले, महिला अधिकाऱ्यानं सांगितलं तसं घडलंच नाही!

वैद्यकीय तपासणीदरम्यान बंदी घातलेली 'टू फिंगर टेस्ट' डॅाक्टरांनी केल्याचा खळबळजनक आरोप महिला अधिकाऱ्याने केला आहे.
Air Chief Marshal V.R.Chaudhari
Air Chief Marshal V.R.Chaudhari

चेन्नई : प्रशिक्षणादरम्यान हवाई दलातील (IAF) महिला अधिकाऱ्यावर फ्लाईट लेफ्टनंटने बलात्कार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. पीडित महिलेने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्याला अटक केली आहे. वैद्यकीय तपासणीदरम्यान डॅाक्टरांनी बंदी घातलेली 'टू फिंगर टेस्ट' केल्याचा खळबळजनक आरोप या महिला अधिकाऱ्याने तक्रारीत केला आहे. यावर अखेर हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल आर.सी.चौधरी (Air Chif Marshal V.R.Chaudhari) यांनी खुलासा केला आहे.

हवाई दलप्रमुख म्हणाले की, अशा प्रकारच्या घटनांसाठी हवाई दल अतिशय कठोर नियम आहेत. संबंधित महिला अधिकाऱ्याची टू-फिंगर टेस्ट घेण्यात आली हे चुकीचे आहे. अशा प्रकार कोणतीही टेस्ट करण्यात आलेली नाही. आम्हा सर्वांना नियम माहिती आणि त्यांची कार्यवाही करणेही माहिती आहे.

पीडित महिलेवर काही दिवसांपूर्वी लैंगिक अत्याचार झाला होता. त्यावेळी त्यांनी याबाबतची तक्रार सुरूवातीला हवाई दलाकडे केली होती. पण प्रत्यक्षात तक्रारीवर अपेक्षित कारवाई झाली नाही. दोनवेळा त्यांना तक्रार मागे घेण्यासाठी सांगण्यात आले होते. एका पत्रावर सही करण्यासाठी दबावही टाकण्यात आला. पण पण तक्रार मागे घेतली नाही. त्यानंतर पोलिसांत तक्रार करावी लागली, असे या महिला अधिकाऱ्याने म्हटले होते.

महिला अधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार केल्यानंतर 29 वर्षीय हवाई दलातील अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. पोलिसांत दिलेल्या तक्रारीमध्ये महिनेने गंभीर आरोप केले आहेत. हवाई दलाकडे केलेल्या तक्रारीनंतर वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी बंदी असलेली टू-फिंगर टेस्ट केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. या वेळी लैंगिक अत्याचाराची दुसऱ्यांदा बळी ठरल्याचे या महिला अधिकाऱ्याने म्हटले होते.

Air Chief Marshal V.R.Chaudhari
...तर मी राजीनामा देतो! केंद्रीय मंत्र्याचे खुले आव्हान

सर्वोच्च न्यायालयानेच टू-फिंगर टेस्टवर बंदी घातलेली आहे. पण त्यानंतर ही टेस्ट करण्यात आल्यानं महिला अधिकाऱ्याला धक्का बसला होता. याबाबत त्यांनी तक्रारीत नमूद केलं होतं. या महिलेसोबत कोईमतूर येथील हवाई दलाच्या प्रशासकीय महाविद्यालयात त्यांच्या खोलीत लैंगिक अत्याचाराची घटना घडली. शहरातील गांधीपुरम पोलीस ठाण्यात एक महिला अधिकाऱ्यांची टीम या घटनेचा तपास करत आहे.

Air Chief Marshal V.R.Chaudhari
तोपर्यंत माझ्या मुलावर अंत्यसंस्कार करणार नाही! पित्याने घेतली भूमिका

संबंधित अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. एका हवाई दलाच्या अधिकाऱ्याला पोलीस अटक करू शकत नाहीत, असे म्हणत त्याच्या वकिलांनी विरोध केला होता. लष्कराच्या प्रक्रियेचे पालन व्हायला हवे, असा दावा वकिलांनी न्यायालयात केला होता. पण न्यायालयानं या अधिकाऱ्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, याबाबत हवाई दलानेही निवेदन प्रसिध्दीस दिले आहे. हवाई दलाकडून पोलिसांना या प्रकरणाच्या चौकशीसाठी सहकार्य केले जात आहे. तसेच दलाकडून अंतर्गत चौकशीही सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्यानं त्यावर फारसे बोलू शकत नाही, असं दलाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com