'एम्स'मधील रहमत अंकलला बेड मिळालाच नाही; अखेर गमावले प्राण

जगातील कोणत्याही देशात आतापर्यंत एका दिवसांत नोंदवण्यात आले नाहीत तेवढे रुग्ण भारताने सलग तिसऱ्या दिवशी नोंदवले आहेत.
aiims shopkeeper dies to covid19 after not getting bed in hospital
aiims shopkeeper dies to covid19 after not getting bed in hospital

नवी दिल्ली : जगातील कोणत्याही देशात आतापर्यंत एका दिवसांत नोंदवण्यात आले नाहीत तेवढे रुग्ण भारताने सलग तिसऱ्या दिवशी नोंदवले आहेत. देशात रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागली आहेत. अशातच  दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील (एम्स) दुकानदाराला कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर बेड न मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अखेर या दुकानदाराचा मृत्यू झाला आहे. 

एम्समधील रहमत अंकल म्हणन प्रसिद्ध असणारे रहमत अहसान (वय49) यांच्या कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून त्यांना ताप येत होता. त्यांचा रक्तदाबही वाढला होता आणि श्वसनासही त्रास होत होता. परंतु, त्यांना कुठल्याच रुग्णालयात बेड मिळाला नाही. त्यांचे दुकान असलेल्या एम्समध्येही त्यांना जागा मिळाला नाही. 

एम्समधील विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या रहमत अंकल यांची शेवटची आठवण म्हणजे त्यांच्या दुकानावरील पाटी राहिली आहे. तब्येत बिघडल्यानंतर त्यांनी दुकानावर एक पाटी लावली होती. तब्येत खराब असल्याने आज दुकान बंद राहील, असे त्यांनी त्यात म्हटले होते. अखेर त्यांचे दुकान उघडलेच नाही. 

रहमत अंकल यांच्या निधनाबद्दल बोलताना एम्समधील एक कर्मचारी म्हणाला की, त्यांनी एम्समध्ये बेड मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना इथे बेड मिळू शकला नाही. अनेक वर्षे ते एम्सच्या कॅम्पसचा भाग असूनही त्यांच्यावर ही वेळ आली. एम्समध्ये सध्या एकही बेड रिकामा नाही. आम्हाला काही झाले तरी आमच्यावरही एम्समध्ये उपचार शक्य नाहीत.

देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 66 लाख 10 हजार 481 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख 89 हजार 544 झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 लाख 46 हजार 786 रुग्ण सापडले, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 25 लाखांवर गेली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या सलग 45 व्या दिवशी वाढली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 25 लाख 52 हजार 940 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 15.37 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होऊन ते 83.49 टक्क्यांवर आले आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 38 लाख 67 हजार 997 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.14 टक्के आहे. 

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 
20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com