भाजपच्या धमाकेदार विजयाची ठाकरे सरकारला धास्ती : दहा मार्चनंतर राज्यातही घडामोडी

पाचपैकी चार राज्यांत भाजप विजयपथावर असल्याने त्याचे परिणाम महाराष्ट्रातही उमटण्याची चिन्हे आहेत..
Uddhav Thackeray-Devendra Fadnavis
Uddhav Thackeray-Devendra Fadnavissarkarnama

पुणे : देशभराचे लक्ष दहा मार्चकडे होते. (UP election result) कारण पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल या दिवशी जाहीर होणार होता. महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्षही याच तारखेकडे होते. कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दहा मार्चनंतर महाराष्ट्रातही बदल होणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे या निकालानंतर महाराष्ट्रातही राजकीय घडामोडी होणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Uddhav Thackeray-Devendra Fadnavis
UP Election Result : भाजप इतिहास घडवणार? सुरूवातीचे कल योगींच्या पारड्यात

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या चार राज्यांत भाजप सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट झले आहे. त्यामुळे भाजपला मोठी ताकद मिळाली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची कामगिरी अशीच राहील, अशी चर्चा आताच सुरू झाली आहे. मात्र यात महाराष्ट्राची सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी भाजप पुन्हा फासे टाकत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेच्या 25 आमदारांनी आम्हाला पुरेसा निधी मिळत नसल्याची जाहीरपणे तक्रार केली होती. त्यातूनच भाजपच्या आशा वाढल्या आहेत. 2019 च्या निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये आलेले इतर पक्षांतील अनेक नेते सत्ता नसल्याने अस्वस्थ होते. आता हे नेते पण भाजपमध्येच निवांत राहणार असल्याचे दिसून येत आहे.

Uddhav Thackeray-Devendra Fadnavis
Goa Election:निकालापूर्वीच कॉग्रेसने सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांची वेळ मागितली..

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत व्हीडीओ बाॅम्ब टाकून महाविकास आघाडीवर जोरादार हल्ला चढविला. त्यातून महाविकास आघाडीला अडकविण्याचे धोरण तर भाजपचे नाही ना, याबाबत राजकीय वर्तुळात बातमी सुरू आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना विविध प्रकरणांत अडकविण्यासाठी केंद्रीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. आणखी काही मंत्री जेलमध्ये पाठविणार असल्याचे भाजपचे नेते जाहीरपणे सांगत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीसमोर अडचणी निर्माण होतील, अशीच पावले भाजप टाकणार आहे. त्यातून शिवसेना किंवा राष्ट्रवादीतील नाराज गट हा आपल्या हाताला लागेल, असा भाजपचा होरा आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी वेगवान बनण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in