कोरोनाचा प्रकोप : सर्वांत मोठा नागा आखाडा कुंभमेळ्यातून पडला बाहेर

जगातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव असणाऱ्या कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. या पार्श्वभूमीवर आखाडे आता कुंभमेळ्यातून बाहेर पडू लागले आहेत.
after nirwani head dies of covid second largest akhara exits from kumbh mela
after nirwani head dies of covid second largest akhara exits from kumbh mela

हरिद्वार : जगातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव असणाऱ्या कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोना महामारीतही खबरदारी न घेता लाखो भाविक स्नानासाठी गंगा नदीच्या किनारी एकत्र आल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. याचबरोबर निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव दास यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा मोठा आखाडा असलेला निरंजनी आखाडा कुंभमेळ्यातून बाहेर पडला आहे.

निरंजनी हा नागा साधूंचा सर्वांत मोठा आखाडा आहे. महामंडलेश्वर कपिल देव दास यांचा कोरोनान मृत्यू झाल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. याविषयी निरजंनी आखाड्याचे सचिव महंत रविंद्र पुरी म्हणाले की, हरिद्वारमधील अनेक आखाड्यातील संत आणि भाविकांना कोरोनाची लक्षणे आढळली आहेत. यामुळे आखाड्याने 17 एप्रिलपासून मेळ्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. 

कुंभमेळ्यात 10 ते 14 एप्रिल या कालावधीत 2 लाख 36 हजार 751 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील दोन हजारहून अधिक पॉझिटिव्ह आढळले आहेत. आरटी-पीसीआर आणि रॅपिड अँटिजेन चाचण्या करण्यात येत असून, यात अनेक आखाड्यांच्या महंतांसह भाविक पॉझिटिव्ह सापडले आहेत, आणखी काही चाचण्यांचे अहवाल हाती आलेले नसून, हा आकडा वाढेल, अशी माहिती हरिद्वारचे मुख्य वैद्यकीय अधिकारी शंभूकुमार झा यांनी दिली. 

हरिद्वार, टिहरी आणि डेहराडून जिल्ह्यांत 670 हेक्टर जागेवर कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक आखाडे हे कोरोना चाचणी करुन घेण्यास नकार देत आहेत. यामुळे कोरोनाचा उद्रेक आणखी मोठा असण्याची शक्यता व्यक्त आहे. देशातील कोरोना रुग्णसंख्येत कुंभमेळ्यामुळे प्रचंड मोठी वाढ होईल, असा इशारा तज्ञ देत आहेत. 

कुंभमेळ्यात आतापर्यंत दोन शाही स्नान झाले आहेत. यातील पहिले 12 एप्रिलला आणि दुसरे 14 एप्रिलला झाले. ही पर्वणी साधण्यासाठी साधू-महंत, विविध आखाड्यांसह सुमारे 48.51लाख भाविक गंगा नदीवर आले होते. यातील बहुतांश हे मास्कविना होते. प्रचंड गर्दीमुळे सुरक्षित अंतर कुठेही दिसत नव्हते. शाही स्नानाची पुढील पर्वणी २७ एप्रिलला आहे. 

कोरोनाची दुसरी लाट देशात आली आहे. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीतही हरिद्वार येथील कुंभमेळ्यातील गर्दी कमी झालेली नाही. उत्तराखंडमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले होते. हरिद्वारमध्ये पाच दिवसांत दोन हजारहून अधिक जणांना संसर्ग झाल्याने नियोजित वेळेआधी कुंभमेळ्याची सांगता करण्यासाठी प्रशासन आखाड्यांशी चर्चा करीत असल्याचे वृत्त आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com