ब्लॅक, व्हाईट, यलो या तिन्ही फंगसचा संसर्ग झालेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू

कोरोनातून बरे झालेल्या अनेकांना म्युकरमायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगस हा आजार होत असल्याने चिंता वाढू लागली आहे. यातच नवनवीन फंगसचा संसर्ग समोर येऊ लागला आहे.
after infection of various fungal infection patient dies in up
after infection of various fungal infection patient dies in up

नवी दिल्ली : कोरोनातून (Covid 19) बरे झालेल्या अनेकांना म्युकरमायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगस (Black Fungus) हा आजार होत असल्याने देशाची चिंता वाढू लागली आहे. यातच देशात काही दिवसांपूर्वी व्हाईट फंगस (white fungus) सापडला होता. आता याहीपेक्षा धोकादायक यलो फंगसही आढळला होती. विशेष म्हणजे एकाच रुग्णाला या तिन्ही फंगसचा संसर्ग झाल्याची बाब समोर आली होती. या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  

महाराष्ट्र, गुजरातसह देशांतील अनेक राज्यांमध्ये म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. या आजारावर वेळीच उपचार न घेतल्यास जीवावर बेतण्याची भीती आहे. रुग्ण वाढू लागल्याने केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळे या आजाराचा समावेश आता इतर साथींच्या आजारामध्ये केला आहे. त्यानुसार साथरोग कायद्यानुसार उपाययोजना राज्यांना केल्या आहेत. 

ब्लॅक, व्हाईटनंतर यलो फंगस समोर आला होता. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये यलो फंगसचा पहिला रुग्ण सापडला होता. धक्कादायक बाब म्हणजे एकाच रुग्णाला ब्लॅक, व्हाईट आणि यलो फंगसचा संसर्ग झाला होता. यलो फंगस हा पाली आणि इतर सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये आढळून येतो. परंतु, आतापर्यंत तो मानवामध्ये आढळला नव्हता. या रुग्णाला अशक्तपणा, चक्कर येणे, ताप आणि सर्दी अशी लक्षणे होती. 

काळजी करण्यासारखे काही नाही लवकरच हा रुग्ण बरा होईल, अशी माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली होती. परंतु, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कुँवर सिंह असे या रुग्णाचे नाव असून, तो 59 वर्षांचा होता. त्याच्या रक्तात विषबाधा झाल्याने त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. 

व्हाईट फंगसचा पहिला रुग्ण बिहारमध्ये सापडला होता. हा आजार म्युकरमायकोसिसपेक्षा धोकादायक असल्याचे तज्ञांचे मत आहे. आतापर्यंत बिहारमध्ये व्हाईट फंगसच्या रुग्णांमध्ये एका डॉक्टरचाही समावेश आहे. यानंतर हा व्हाईट फंगस इतर राज्यांतही पसरू लागला आहे. संसर्गजन्य विषाणूप्रमाणे ते आणखी धोकादायक ठरू शकतो, असे तज्ञांचे मत आहे. 

व्हाईट फंगस हा शरीरातील महत्वाच्या अवयवांपर्यंत सहजपणे पोचू शकतो. यात फुफ्फुसे, मूत्रपिंडे, आतडे, पोट यांचा समावेश आहे. याचा संसर्ग नखांमधूनही होऊ शकतो. म्युकरमायकोसिसप्रमाणे व्हाईट फंगसही जीवघेणा आहे. गर्भवती आणि लहान मुलांसाठी तो आणखी धोकादायक आहे. कोरोनाप्रमाणेच याची लक्षणे आहेत, अशी माहिती तज्ञांनी दिली. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com