नवीन पेट्रोलियम मंत्र्यांनी पदभार स्वीकारला अन् 24 तासांतच पेट्रोल, डिझेलचा नवा रेकॉर्ड - after hardeep singh puri takes charge petrol and diesel reach all time high | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

नवीन पेट्रोलियम मंत्र्यांनी पदभार स्वीकारला अन् 24 तासांतच पेट्रोल, डिझेलचा नवा रेकॉर्ड

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 जुलै 2021

देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. 

नवी दिल्ली : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Petrol) दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात झालेल्या मोठ्या फेरबदलानंतर पेट्रोलियम मंत्रालय (Petroleum minister) हरदीपसिंग पुरी (Hardeep Singh Puri) यांच्याकडे आले आहे. कालच त्यांनी मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर 24 तासांत नागरिकांना इंधन दरवाढीचा दणका बसला आहे. 

देशभरात आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 35 पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटj 9 पैसे वाढ करण्यात आली. यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. अर्ध्या देशात पेट्रोलचा दर 100 रुपयांवर पोचला आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर 100.56 रुपये तर मुंबई 106.59 रुपयांवर गेला आहे. डिझेलचा दर दिल्लीत 89.62 रुपये आणि मुंबईत 97.18 रुपयांवर पोचला आहे. 

विशेष म्हणजे नवीन पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी कालच (8 जुलै) पेट्रोलियम मंत्रालयाचा पदभार स्वीकारला होता. यानंतर 24 तासांतच पेट्रोल आणि डिझेलने विक्रमी कामगिरी केली आहे. काल पदभार स्वीकारल्यानंतर पुरी म्हणाले होते की, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबाबत मला माहिती घ्यावी लागेल. यासाठी मला थोडा वेळ द्या. मी आताच या मंत्रालयात पाऊल ठेवले असून, इंधन दरवाढीवर  बोलणे योग्य ठरणार नाही. 
  
हेही वाचा : बहिणीने नवीन पक्ष स्थापन केला पण मुख्यमंत्री तिकडे फिरकलेही नाहीत 

देशात पेट्रोलआणि डिझेलच्यादरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोलच्या दरासोबत डिझेलनेही शंभरचा टप्पा ओलांडण्यास सुरवात केली आहे.यातच आता एलपीजी सिलिंडर दरवाढीची भर पडली आहे. अशातच आता स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder) दरात वाढ करण्यात आली आहे. मागील 6 महिन्यांत एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 140 रुपयांची वाढ झाली आहे. याचबरोबर विमान इंधनाच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. 

जनतेच्या खिशाला कात्री 
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मागील सात वर्षांत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावून सरकारने आपली झोळी भरुन घेतली आहे. भाजप सरकारच्या काळात पेट्रोलवरील करात 220 टक्के आणि डिझेलवरील करात 600 टक्के वाढ झाली आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मे 2014 मध्ये भाजपचे सरकार आले. त्यावेळी केंद्र सरकारचा पेट्रोलवरील प्रतिलिटर कर 10.38 रुपये होता आणि आता तो 32.90 रुपये आहे. मे 2014 मध्ये केंद्र सरकारचा डिझेलवरील प्रतिलिटर कर 4.52 रुपये होता. तो आता 31.80 रुपये आहे. म्हणजे मागील सात वर्षांत पेट्रोलवरील करात 220 टक्के आणि डिझेलवरील करात 600 टक्के वाढ झाली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख