कोव्हिशिल्ड लशीवर युरोपियन युनियनने फुली मारली अन् अदर पूनावाला म्हणाले... - after eu not recognised covishield SII ceo adar poonawalla clarifies | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

कोव्हिशिल्ड लशीवर युरोपियन युनियनने फुली मारली अन् अदर पूनावाला म्हणाले...

वृत्तसंस्था
सोमवार, 28 जून 2021

युरोपियन युनियनने त्यांच्या व्हॅक्सिन पासपोर्टमध्ये कोव्हिशिल्डचा समावेश केलेला नाही. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 

नवी दिल्ली : देशातील कोरोना लसीकरण (Covid Vaccination) पुन्हा एकदा वेगाने सुरू झाले आहे. परंतु, आता कोव्हिशिल्ड (Covishield) लशीबाबत नवीन समस्या निर्माण झाली आहे. ही लस घेतलेल्या व्यक्तींना युरोपियन युनियनचे (European Union) सध्या तरी बंद राहतील, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावर कोव्हिशिल्डचे उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (SII) मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावालांनी (Adar Poonawalla) खुलासा केला आहे.   

अदर पूनावालांनी ट्विटरवर म्हटले आहे की, युरोपियन युनियनमध्ये प्रवास करताना कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या भारतीयांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. युरोपियन युनियनच्या नव्या व्हॅक्सिन पासपोर्ट योजनेत अॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने विकसित केलेली आणि सिरमने उत्पादित केलेली कोव्हिशिल्ड लस नाही. मी हा मुद्दा उच्च स्तरीय पातळीवर उपस्थित केला आहे. नियामक आणि राजनैतिक पातळीवर सर्व  देशांशोबत यावर लवकरच तोडगा निघेल. 

युरोपियन युनियनच्या नवीन व्हॅक्सिन पासपोर्ट योजनेत कोव्हिशिल्डचा समावेश नाही. 1 जुलैपासून युरोपियन युनियन डिजिटल कोव्हिड सर्टिफिकेट योजना सुरू करीत आहेत. याअंतर्गत कोरोना लस घेतलेल्या नागरिकांना युरोपियन युनियनमध्ये मुक्तपणे कुठेही प्रवास करता येईल. संबंधित व्यक्तीने कोरोना लस घेतली आहे, तो निगेटिव्ह चाचणी केलेला अथवा कोरोनातून बरा झालेला याचा पुरावा हे प्रमाणपत्र पुरावा असेल. युरोपियन युनियनच्या बाहेरील व्यक्तींना हे प्रमाणपत्र सदस्य देशांममध्ये प्रवास करण्यासाठी आवश्यक असेल. 

हेही वाचा : एकाच तरुणीला दोन मिनिटांत कोरोना लशीचे दोन डोस 

या योजनेत कोव्हिशिल्डचा समावेश नसल्याने ही लस घेतलेल्या व्यक्तींना युरोपियन युनियनमध्ये प्रवास करता येणार नाही. त्यांना प्रवास करण्यासाठी अनेक बंधने असतील. त्यांना विलगीकरणात राहावे लागेल अथवा प्रत्येक देशांतील नियमांप्रमाणे उपाययोजना कराव्या लागतील.    

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. आता केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

मागील 24 तासांत भारतात कोरोनाचे 46 हजार 148 रुग्ण सापडले असून, 979 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या 3 कोटी 2 लाख 79 हजार 331 वर पोचली आहे. याचबरोबर एकूण कोरोना मृत्यू 3.96 लाखांवर गेले आहेत. मागील काही आठवड्यांपासून देशातील रुग्णसंख्या कमी होत आहे. देशातील एकूण 5.6 टक्के प्रौढ लोकसंख्येला कोरोना लशीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख