चहाला बदनाम करण्याचं षडयंत्र, पंतप्रधान मोदी अन् प्रकाश राज यांचा निशाणा...

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामच्यादौऱ्यावर होते. भारतीय चहाला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
actor prakash raj slams narendra modi over theory of conspiracy to defame tea
actor prakash raj slams narendra modi over theory of conspiracy to defame tea

धेकियाजुली  : भारतीय चहाच्या प्रतिमेला बदनाम करण्याचे षडयंत्र परकी शक्ती आखत आहेत. भारताची चहाची ओळख पुसून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. देशाला बदनाम करणाऱ्यांनी आता चहाच्या क्षेत्रालाही सोडले नाही, अशी गौप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  केला. यावर ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज यांनी ट्विटरवरुन मोदींवर निशाणा साधला आहे.  

आसाममध्ये येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणूक होत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा मागील १५ दिवसांतील हा दुसरा आसाम दौरा आहे. मोदींच्या हस्ते आज 'आसाम माला' या राज्य रस्ते प्रकल्पाचे तसेच, विश्‍वनाथ आणि चराइदेव येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे भूमिपूजन झाले. ईशान्य भारतात पक्ष विस्तार करण्यासाठी भाजपने आक्रमकपणे पावले उचलण्यास सुरवात केली आहे. 

काही दिवसांपूर्वी 'ग्रीनपीस' स्वंयसेवी संस्थेने एक अहवाल जाहीर केला आहे. या अहवालात आसाममधील चहाच्या मळ्यांमध्ये आवश्‍यकतेपेक्षा जास्त प्रमाणात कीटकनाशकांचा वापर केला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. या अहवालाचा उल्लेख न करता पंतप्रधानांनी चहाला बदनाम करण्यासाठी सुरू असलेल्या षडयंत्राचा समाचार घेतला. 

मोदी म्हणाले की, आसामची प्रगती ही चहाच्या मळ्यांतील कामगारांच्या प्रगतीशी निगडित आहे. देशाला बदनाम करण्याचे कारस्थान करणारे आता भारताच्या चहालाही सोडत नाहीत. योजनाबद्धरीत्या भारतीय चहाच्या प्रतिमेला जगात बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे कारस्थान रचणारे म्हणत आहेत की, भारतीय चहाच्या प्रतिमेला बदनाम करायचे आहे. याबाबतची काही कागदपत्रेही उघड झाली आहेत. भारतीय चहाला बदनाम करण्याचे काम हाती घेतलेल्या व्यक्तींविरुद्ध येथील राजकीय पक्ष गप्प आहेत. त्या सर्व राजकीय पक्षांना आता प्रत्येक चहा बागायतदार, भारतीय चहा पिणारा प्रत्येक व्यक्ती उत्तर मागेल. त्या सर्वांना याचे उत्तर द्यावं लागेल.

मोदींनी चहाला बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचं सांगितल्यानंतर प्रकाश राज यांनी ट्विट केले आहे. नेहमीप्रमाणे..केवळ चहाचीच चर्चा, असे ट्विट त्यांनी केले आहे. या ट्विटमधून त्यांनी मोदींच्या पूर्वीच्या चहा विकण्यावर निशाणा साधल्याची चर्चा आहे. याचबरोबर त्यांनी 'चाय पे चर्चा; या भाजपच्या मोहिमेची खिल्लीही उडवल्याची चर्चा आहे. या ट्विटला नेटिझन्सनी मोठा प्रतिसाद दिला आहे. 

अनेक नेटिझन्सनी या ट्विटला प्रतिसाद देत मोदी सरकारवर टीका केली आहे. काही जणांनी भाजप जिथे जाईल तिथे काही तरी धोक्यात कसं येतं, असा सवाल केला आहे. चहाला कोण आणि कसे बदनाम करु शकते, असाही सवालही काहींनी केला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com