अखेर भाजपने मिथुन चक्रवर्तींना बंगालच्या मैदानात उतरवले... - actor mithun chakraborty is not bjp candidate but star campaigner for bjp | Politics Marathi News - Sarkarnama

अखेर भाजपने मिथुन चक्रवर्तींना बंगालच्या मैदानात उतरवले...

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 मार्च 2021

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी मोठा गाजावाजा करीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना पक्षाने उमेदवारी न देता दुसरी जबाबदारी सोपवली आहे. 

कोलकता : ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी मोठा गाजावाजा करीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु, त्यांना विधानसभेचे तिकिट देण्यात आले नव्हते नाही. पक्षात प्रवेश केल्यानंकर आज प्रथमच ते पक्षाच्या प्रचारात  सहभागी झाले. पण मिथुन हे उमेदवार म्हणून नव्हे तर, स्टार प्रचारक म्हणून बंगालच्या रणांगणात उतरले आहेत. मिथुन यांनीही या सर्व प्रकारावर अखेर मौन सोडले आहे. 

मिथुन यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आज प्रथमच ते पक्षाच्या प्रचारात सहभागी झाले. परंतु, ते उमेदवार म्हणून नव्हे तर स्टार प्रचारक म्हणून मैदानात उतरले आहेत. आज पहिल्याच दिवशी त्यांनी तीन जिल्ह्यांत तीन रोड शो केले. सालटोरा, झारग्राम आणि केशियारी या तीन जिल्ह्यांत ते हेलिकॉप्टरने प्रचारासाठी फिरले. चाहत्यांनी अनेक ठिकाणी त्यांचे 'दादा'च्या गजरात स्वागत केले. गर्दीतील अनेक जण मिथुन आणि हेलिकॉप्टर पाहण्यासाठी आल्याचे सांगत होते. 

मला कोणतीही राजकीय महत्वकांक्षा नाही. माझे येथील जनतेशी नाते केवळ हिरो आणि फॅन असे नाही. आमचे दृदयाचे नाते आहे. आम्ही एकमेकांशी हृदयातून जोडले गेलो आहोत, असे मिथुन यांनी या वेळी बोलताना सांगितले. 

भाजपने बंगालसाठी 13 उमेदवारांची अखेरची यादी जाहीर केली होती. मिथुन यांच्यासाठी रासबिहारी हा मतदारसंघ राखीव ठेवला जाईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु, भाजपने लेफ्टनन्ट जनरल (निवृत्त) सुब्रत साहा यांनी तेथून उमेदवारी दिली आहे. काश्मीरमधील संघर्षाच्या काळात साहा तेथे नियुक्तीस होते. यामुळे मिथुन हे विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता मावळली आहे.  

ब्रिगेड मैदानावर मिथून चक्रवर्ती यांनी नुकताच भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील घरी जाऊन मिथुन चक्रवर्ती यांची भेट घेतली होती. तेव्हाच मिथुन यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे औचित्य साधून मिथुन यांनी पक्षप्रवेश केला होता. 

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर 70 वर्षीय अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी तृणमूल काँग्रेस व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला होता. 'मी एक नंबरचा कोब्रा आहे, डसलो तर तुम्ही फोटो बनाल,' असे डायलॉग बोलत मिथुन यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या चित्रपटांतील काही डायलॉगही बोलून दाखविले. 

त्यावेळी बोलताना मिथुन यांनी अप्रत्यक्षपणे तृणमूल काँग्रेसला लक्ष्य केले होते. ते म्हणाले होते की, मी बंगाली असल्याचा गर्व आहे. मला माहीत आहे की, लोकांना माझे डायलॉग आवडतात. माझा नवीन डायलॉग आहे, मी प्युअर कोब्रा आहे. मी डसलो तर तुम्ही फोटो बनाल. आमचा हक्क कुणी हिरावून घेण्याचा प्रयत्न केल्यास मी फणा काढेन.  भाजपमध्ये प्रवेश करणे हा स्वप्न साकार झाल्यासारखे आहे. मी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या पंतप्रधानांसोबत व्यासपीठावर आहे.

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख