पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघातच भाजपला मोठा धक्का...अभाविप शून्यावर बाद!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघातच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
abvp looses election in pm narendra modi constituency varanasi
abvp looses election in pm narendra modi constituency varanasi

वाराणसी : भाजपची विद्यार्थी शाखा असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला (अभाविप) विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. हा पराभव इतरत्र कुठे नाही तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदारसंघातच झाला आहे. यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. याचवेळी काँग्रेसची एनएसयूआय आणि समाजवादी पक्षाची छात्र सभा यांनी मोठे यश मिळाले आहे. 

वाराणसीतील महात्मा गांधी काशी विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेची निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत अभाविपच्या सर्वच उमेदवारांचा पराभव झाला आहे. याचवेळी समाजवादी पक्षाची समाजवादी छात्र सभेचा अध्यक्ष निवडून आला आहे. छात्र सभेचे विमलेश यादव हे अध्यक्ष बनले आहेत. काँग्रेसच्या एनएसयूआयलाही चांगले यश मिळाले असून, संघटनेचे आठही उमेदवार निवडून आले आहेत. एनएसयूआयचे उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि सहा सदस्य निवडून आले आहे. 

वाराणसी हा पहिल्यापासून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला राहिला आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथून निवडणूक लढवल्याने या मतदारसंघावर कायम लक्ष असते. याठिकाणी नेहमीच भाजपला फायदा झाल्याचे दिसून येते. परंतु, आता अभाविपचा पराभव झाल्याने भाजपसह संघ परिवाराला मोठा धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत आहे. विद्यापीठातील या निवडणुका या बदललेल्या जनमत दर्शवत आहेत, असा दावा काही राजकीय विश्लेषक करीत आहेत. 

वाराणसीत भाजपला दुसरा धक्का 
वाराणसीत भाजपला आता दुसरा धक्का बसला आहे. वाराणसीत सर्व विधानसभा मतदारसंघात आमदार भाजपचे आहेत. असे असतानाही काही महिन्यांपूर्वी झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदासंघाच्या निवडणुकीत भाजपला पराभवा झाला होता. पदवीधर आमदार आणि शिक्षक आमदार निवडणुकीत समाजवादी पक्षाने यश मिळवले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com