एकाच रुग्णालयातील 80 डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग; रुग्णांवरील उपचारात मात्र खंड नाही

सरोज हॉस्पिटलमधील तब्बल 80 डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
80 doctors of saroj hospital of delhi tests covid positive
80 doctors of saroj hospital of delhi tests covid positive

नवी दिल्ली : येथील सरोज हॉस्पिटलमधील (Saroj Hospital) तब्बल 80 डॉक्टरांना (Doctors)  कोरोनाचा (Covid19) संसर्ग झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अशा परिस्थितीतही अपुऱ्या मनुष्यबळासह हॉस्पिटलने रुग्णांवरील उपचार कायम ठेवले आहेत. एवढेच नव्हे तर रुग्णालयातील एका सर्जनचा कोरोनाने मृत्यूही झाली आहे. सरोज हॉस्पिटलच्या उदाहरणामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रकर्षाने समोर आला आहे. 

सरोज हॉस्पिटलमधील 80 डॉक्टरांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले. यातील 12 डॉक्टरांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर डॉक्टर गृह विलगीकरणात आहेत. हॉस्पिटलमधील वरिष्ठ सर्जन डॉ.अनिलकुमार रावत यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अनेक डॉक्टरांना कोरोना संसर्ग झाल्याने सध्या दाखल रुग्णांवर रुग्णालयाने उपचार सुरू ठेवले आहेत. मात्र, मनुष्यबळाच्या टंचाईमुळे रुग्णालयाने नवीन रुग्ण दाखल करुन घेणे बंद केले आहे. 

दिल्लीतील सरोज हॉस्पिटल 1996 मध्ये सुरू झाल्यापासून डॉ. रावत (वय 58)  तेथे कार्यरत  होते. ते सहकाऱ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय होते. त्यांनी कोव्हिशिल्ड लशीचा दुसरा डोस मार्चच्या सुरवातीला घेतला होता, अशी माहिती सरोज हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ.पी.के.भारद्वाज यांनी दिली. ते म्हणाले की, रावत माझ्या मोठ्या मुलासारखे होते. मौलाना आझाद कॉलेजमधूल त्यांनी एमएम केले होते. आर.बी.जैन रुग्णालयातील माझ्या युनिटमध्ये त्यांनी 1994 मध्ये पेशाची सुरवात केली. अखेरच्या श्वासापर्यंत ते माझ्यासोबत राहिले. 

डॉ.रावत यांनी 10 ते 12 दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. ते सुरवातीला गृह विलगीकरणात होते. नंतर त्यांची ऑक्सिजन पातळी घसरल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना वाचवण्यासाठी सहकाऱ्यांनी प्रयत्नांची शर्थ केली. परंतु, त्यांना यश आले नाही. अखेर 9 मे रोजी डॉ. रावत हे कोरोना विरोधातील लढा हरले. 

देशात 24 तासांत 3 लाख 29 हजार रुग्ण 
देशातील कोरोना रुग्णांची संख्याही सोमवारी कमी झाली आहे. सोमवारी 24 तासांत देशात 3 लाख 29 हजार 942 रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 2 कोटी 29 लाख 92 हजारांवर पोहचला आहे. तर 24 तासांत 3 हजार 876 मृत्यू झाले असून एकूण मृत्यूचा आकडा जवळपास अडीच लाखांवर पोहचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. महाराष्ट्रासह चार ते पाच राज्यांतील कोरोना रुग्णांचे देशातील प्रमाणच जवळपास 50 टक्के आहे. त्यामध्ये रविवारपर्यंत महाराष्ट्र आघाडीवर होता. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com