आंदोलनासाठी राऊतांना माझी गरज का वाटावी..?  -  Why should Raut need me for agitation   | Politics Marathi News - Sarkarnama

आंदोलनासाठी राऊतांना माझी गरज का वाटावी..? 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

ज्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून ते सरकार मध्ये आहेत. त्या काँग्रेस आमदारामुळे शिवाजी महाराज यांचा पुतळा बेळगाव मधून काढला गेला, याचा जाब आधी त्यांनी काँग्रेसला विचारावा

सिंधुदुर्ग : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होत असेल तर मी  कुठेही जाउन आंदोलन करायला तयार आहे, पण त्यासाठी संजय राऊतांना माझी गरज का वाटावी ? ज्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून ते सरकार मध्ये आहेत. त्या काँग्रेस आमदारामुळे शिवाजी महाराज यांचा पुतळा बेळगाव मधून काढला गेला, याचा जाब आधी त्यांनी काँग्रेसला विचारावा, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातल्या लाईफटाईम हॉस्पिटलमधल्या कोविड टेस्ट लॅबच्या उद्घाटनासाठी फडणवीस सिंधुदुर्गात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.  

बेळगाव जिल्ह्यात मनगुत्ती येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविल्याची घटना नुकतीच घडली आहे. काल शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना याबाबत आंदोलन करायचे असेल तर त्यांनी ते करावे. या पार्श्वभूमीवर फडणवीस बोलत होते. काल दादर येथील शिवसेनाभवनासमोर कर्नाटकाचे मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि कर्नाटक सरकारचा निषेध करीत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी प्रतिकात्मक पुतळा ताब्यात घेतला. मात्र शिवसैनिकांनी कर्नाटक सरकार आणि येडियुरप्पांविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध केला. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीही झाली.

हेही वाचा : राष्ट्रवादीच्या 'या' आमदारांना तहसीलदारांच्या पतीकडून धमकी... 

राजगुरूनगर : खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी तहसीलदार आमले पाटील यांच्या पतीपासून आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार काल खेड पोलिसांकडे दिली आहे. ते वाळू माफिया, भूखंड माफिया आणि माझे राजकीय विरोधक यांच्या सहाय्याने, माझा घातपात करण्याची दाट शक्यता आहे. म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे. ही घटना राजकीय वर्तुळात चर्चचा विषय ठरली आहे. खेड तालुक्यातील तलाठी, मंडलाधिकारी यांच्यावर तहसीलदारांचे नियंत्रण नसून, हे कर्मचारी गरीब आणि पीडित जनतेला त्रास देत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या तक्रारी आपणाकडे येतात. भोमाळे, भोरगिरी, पदरवाडी इत्यादी गावांना भूस्खलनाचा धोका आहे. त्यांनी याबाबत उपाययोजना केलेली नाही. गुळाणी गावातील, भगवान गुळाणकर यांनी तहसीलदारांच्या समोर विषप्राशन करून आत्महत्या केली, हे प्रकरणही दाबले गेले, असे आमदारांनी त्यांच्या तक्रार अर्जात म्हटले आहे. याबाबत मोहिते पाटील यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख