आमदार कुचेंच्या सालगड्याची माघार, अर्जच भरलाच नाही..

आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मदुत संपली तेव्हा सालगड्याने आपल्या मालकाचा आदेश शिरसावंद मानत मेहुण्याचा आग्रह मोडल्याचे स्पष्ट झाले. निवडणुकीला उभे राहून पराभूत झालो तर हातचे काम देखील जाईल, असा व्यवहार्य विचार करत अखेर सालगड्याने नमते घेतले.
आमदार कुचेंच्या सालगड्याची माघार, अर्जच भरलाच नाही..

औरंगाबादः ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरू नको, तुला निवडणूक लढवायची असेल तर माझे पैसे आधी दे, काम सोड अन मग उभा राहायं, अशी धमकी बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांनी आपल्या सालगड्याला दिली होती. या धमकीचा आणि सालगड्याच्या मेव्हण्याशी कुचे यांचा झालेला संवाद याचा आॅडिओ चांगलाच चर्चेत आला होता. अखेर सालगड्याने मेव्हण्याचा आग्रह झिडकारत कुचे यांच्याकडेच काम करण्याचा निर्णय घेत माघार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामपंचाय निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता, परंतु सालगड्याने अर्जच दाखल केला नसल्याचे समोर आले आहे.

बदनापूर तालुक्यातील बावने पांगरी गावातील ग्रामपंयात निवडणुकीत आपल्या भावजीने उमेदवारी अर्ज भरावा, अशी मेव्हण्याची इच्छा होती. मतदारसंघातील अनेक ग्रामपंचायती बिनविरोध करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजप आमदार नारायण कुचे यांना याची कुणकुण लागली. तेव्हा त्यांनी सालगड्याला धमकावले. खबरदा निवडणुकीला उभा राहशील तर. उभचं रहायचं असलं तर आधी माझ्याकडून घेतलेले पैसे, दे माझे काम सोड अन् मग खुशाल उभा राहा, असा दम कुचे यांनी सालगड्याला भरला होता.

तिकडे दाजीला निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याचा तयारीत असलेल्या मेव्हण्याला जेव्हा हे कळाले तेव्हा, त्याने थेट आमदार कुचे यांनाच फोन लावत माझ्या भावजीला धमक्या का देता? आमच्या गावांत हस्तक्षेप का करता? तुम्हाल मतं मागायला पुन्हा आमच्या गावात यायचे नाही का? असा सवाल करत जाब विचारला होता. यावर कुचे यांनी देखील मी का तुझ्या भरवशावर निवडूण येतो का? तुझ्या भावजीला निवडणूक लढवायची असलं तर आधी माझे पैसे दे, काम सोड आणि मग उभा रहायं, मी बघून घेतो, अशा शब्दांत आव्हान दिले होते.

दरम्यान, कुचे आणि मेव्हण्यामध्ये झालेल्या संवादाची आॅडिओ क्लीप सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. त्यामुळे सालगडी आमदार कुचेंचा आदेश मानतो का मग मेहुण्याचा मान राखत निवडणुकीला उभा राहतो, याची उत्सूकता जिल्ह्यात होती. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मदुत संपली तेव्हा सालगड्याने आपल्या मालकाचा आदेश शिरसावंद मानत मेहुण्याचा आग्रह मोडल्याचे स्पष्ट झाले. निवडणुकीला उभे राहून पराभूत झालो तर हातचे काम देखील जाईल, असा व्यवहार्य विचार करत अखेर सालगड्याने नमते घेतले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com