आपली नेते मंडळी पवार साहेबांसमोरही रेटून बोलतात... - Our leaders have given information in front of Pawar Saheb which was unknown to me | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आपली नेते मंडळी पवार साहेबांसमोरही रेटून बोलतात...

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 12 डिसेंबर 2020

समाजकारण, राजकारण सर्व जातीधर्माच्या लोकांसह शेतकऱ्यांकरिता झटणारे एक नेतृत्व आपल्या पक्षात आहे. त्याचा आपल्याला अभिमान असून आपल्या सर्वांचा तो स्वाभिमान आहे, अशा शब्दांत अजित पवार यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या. 

मुंबई : नेते मंडळींची भाषणे ऐकताना काही गोष्टींमुळे आमच्या ज्ञानात इतकी भर पडली की माझ्या आजी, आजोबांकडूनही कधी ऐकले नव्हते, इतक्या गोष्टी मला अपल्या नेते मंडळींकडून ऐकायला मिळाल्या. विशेष म्हणजे पवारसाहेबांच्या देखत आपली नेते मंडळी इतके रेट्टून बोलतात, हे मी पहिल्यांदाच पाहिले, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. 

शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पुढाकाराने मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व्हर्चूअल रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
 
अजित पवार हे आपल्या रोखठोक शैलीबद्दल प्रसिद्ध आहेत. शरद पवार यांच्याआधी त्यांचे भाषण झाले. तोपर्यंत सर्व नेत्यांची शरद पवार यांना शुभेच्छा देणारी भाषणे झाली. या भाषणांवर थेट अजितदादांनी भाष्य केले नाही. ते म्हणाले की मी सगळ्यांची भाषणे ऐकत होतो. वयाच्या दहाव्या वर्षापासून ते ५० वर्षे पवार साहेबांचा कार्यकाळ डोळ्यासमोरून गेला. या सगळ्या नेत्यांची भाषणे एकत असताना काही गोष्टींमुळे ज्ञानात भर पडली. मी माझ्या आजी आजोबांकडून कधी ऐकले नव्हते, इतक्या गोष्टी मला आपल्या नेते मंडळींकडून ऐकायला मिळाल्या. पवारासाहेबांच्या देखत ही आपली मंडळी इतके रेटून बोलतात, हे मी पहिल्यांदा पाहिले. यातील गंमतीचा भाग सोडून द्या पण ही वस्तुस्थिती आहे. 

अजितदादा म्हणाले की `कोरोनाचे सावट असताना देखील १२ डिसेंबर हा आपल्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण असून आपण तो एकत्र घालविला. राज्यात मोठ्याप्रमाणात रक्ताचा तुटवडा आहे. राष्ट्रवादच्या कार्यकर्त्यांनी रक्तदानाची शिबिरे आयोजत केलेली होती. त्यामुळे या संकटावर मात करताना खचून न जाता व यश मिळाले म्हणून हूरळून न जाता जनतेसाठी राबले पाहिजे. हे आपण पवार साहेबंकडून शिकले पाहिजे. अशा पद्धतीने काम करणार नेता या शतकात तरी कोणी होईल, असे मला वाटत नाही. समाजकारण, राजकारण सर्व जातीधर्माच्या लोकांसह शेतकऱ्यांकरिता झटणारे एक नेतृत्व आपल्या पक्षात आहे. त्याचा आपल्याला अभिमान असून आपल्या सर्वांचा तो स्वाभिमान आहे. राज्यातील १३ कोटी जनतेच्यावतीने आणि उपमुख्यमंत्री या नात्याने हिमालयाच्या उंचीच्या महाराष्ट्राच्या या सह्याद्रीला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख