आर. आर. पाटलांच्या पुत्राची यशस्वी सुरूवात

खासदार संजय पाटील यांनी ताकद लावूनही अपेक्षित यश मिळाले नाही. तर राष्ट्रवादीचा काही ग्रामपंचायतींमधील पराभव जिव्हारी लागणारा ठरला आहे.
Good start for Rohit R patil in Gram Panchayat election
Good start for Rohit R patil in Gram Panchayat election

तासगाव : तासगाव तालुक्‍यातील ग्रामपंचायतीचे निकाल भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसलाही आत्मचिंतन करायला लावणारे आहेत. पण काही गावांमध्ये राष्ट्रवादीला मिळालेले यश आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्या राजकारणातील पुढील यशस्वी वाटचालीच्या दृष्टीने सुचक ठरले आहेत.

तालुक्यातील सावळज, येळावी, कवठेएकंदचे निकाल धक्कादायक मानावे लागतील. दिवंगत आर. आर. आबांच्या निधनानंतरची ही दुसरी निवडणूक होती. पाच वर्षापुर्वीच्या झालेल्या पडझडीमुळे ऐन निवडणुकीत पक्षाच्या नेत्यांना धावपळ करावी लागली होती. मात्र, यंदाची निवडणूक राष्ट्रवादीला काहीशी सावरणारी ठरली आहे.

येळावी, सावळज या ग्रामपंचायती विरोधकांकडून खेचून घेण्यात यश मिळाले आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या हातून हा ग्रामपंचायती निसटल्या होत्या. कवठेएकंदचा पराभव मात्र नेत्यांच्या जिव्हारी लागणारा आहे. कवठेएकंदसह तुरचीमध्ये राष्ट्रवादीत उफाळून आलेल्या गटबाजीमुळे पराभव पत्करावा लागल्याचे दिसून आले.

राष्ट्रवादीने लिटमस टेस्ट मानून विधानसभेपूर्वी मूठ बांधण्याची गरज आता निर्माण झाली आहे. रोहित आर. पाटील, सुरेश पाटील यांनी लक्ष घातले असते तर निवडणुकीतील चित्र आणखी वेगळे दिसले असते. पण यंदाची निवडणूक रोहित पाटील यांच्या पुढील वाटचालीसाठी चांगली सुरुवात झाल्याची चर्चा आहे.

खासदार संजय पाटील व भाजपसाठीही काही निकाल धक्का देणारे आहेत. त्यामुळे ही निवडणूक पक्ष व खासदारांना गांभीर्याने विचार करायला लावणारी आहे. दुसरीकडे काकांचा गट आजही अभेद्य आहे हेही निकालांवरून स्पष्ट झाले.

पाच वर्षांनंतर काका गटातून आऊटगोइंग सुरू झाले असून कार्यकर्ते राष्ट्रवादीत परतत आहेत. त्याचा परिणाम पूर्व भागात झाल्याचे दिसून आले. सावळज मध्ये सत्ता टिकविणे त्यांच्यासाठी महत्वाचे असतानाही त्यांना यश मिळाले नाही. काही गावात काका गटातील गटबाजी तर येळावीत अतिआत्मविश्वास नडला.

बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा पराभव

बोरगाव ग्रामपंचायतीवर नेहमीच राष्ट्रवादीची सत्ता राहिली आहे. मात्र, यावेळी काका गटाने या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले. मोठ्या फरकाने विजय संपादन करीत काका गटाने ही ग्रामपंचायत ताब्यात घेतली. मांजर्डे ग्रामपंचयातीमध्ये राष्ट्रवादीने सर्वच्या सर्व 15 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व राखले. काका गटाने या निवडणूकीत प्रचंड ताकद लावल्याने चुरस वाढली होती. पण त्यांना सपाटून पराभव पत्करावा लागला. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com