नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुका डिसेंबरमध्ये; आयोग लागलं कामाला

राज्यातील काही नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची मुदत डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत संपत आहेत.
Municipal Council Nagar Panchayat elections in December
Municipal Council Nagar Panchayat elections in December

मुंबई : राज्यातील अनेक नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुका येत्या डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून (Election Commission) संबंधित यंत्रणांना प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार 23 ऑगस्टपासून या कामाला सुरूवात करण्याची सुचना आयोगानं राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. (Municipal Council, Nagar Panchayat elections in December)

राज्यातील काही नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची मुदत डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत संपत आहेत. तसेच काही नवनिर्मित नगरपरिषदा व नगरपंचायतींची निवडणूकही या कालावधी घेण्याबाबत आयोगाकडून विचार सुरू आहे. त्यानुसार प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले आहे. मुदत संपण्यापूर्वी निवडणूक घेण्यासाठी प्रभाग रचना वेळेवर अंतिम व्हावी, यासाठी आयोगाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. आयोगाकडून शुक्रवारी याबाबतचे आदेश काढले. 

राज्य शासनाने ता. 12 मार्च 2020 रोजी प्रसिध्द केलेल्या महाराष्ट्र नगरपरिषदा/नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अधिनियम, 2020 अन्वये सर्व नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग पध्दती लागू केली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभाग हा एक सदस्याचा असेल. तसेच प्रभाग रचनेसाठी जनगणना कार्यालयाने प्रसिध्द केलेली लोकसंख्येची अलिकडची आकडेवारी म्हणजेच 2011 ची लोकसंख्या विचारात घ्यायची, असल्याचं आयोगानं स्पष्ट केलं आहे. 

राजकीय दबावाला बळी पडून अयोग्य प्रकारे प्रभाग रचना केली जात असल्याचे मागील अनेक निवडणुकांमध्ये निदर्शनास आल्याचे आगोयानं म्हटलं आहे. अशामुळे अलिकडच्या काळात अनेक रिट याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. काही याचिकांमध्ये अशा चुकीच्या प्रभाग रचनेबाबत आदेश दिलेले आहेत. यामुळे सदर तयार केलेला कच्चा आराखडा कसा तयार करण्याला आला? का तयार करण्यात आला? नियम व निकषांचे पालन झाले आहे का? आदी बाबी आयोगाकडून अ व ब वर्ग नगरपरिषदांचा प्रत्यक्ष बैठकीद्वारे तर क वर्ग नगरपरिषदा व नगरपंचायतीची ऑनलाईन पध्दतीने तपासण्यात येईल, असंही आयोगानं स्पष्ट केलं आहे. 

दरम्यान, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. पण हे तीनही पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता धुसर आहे. काँग्रेसनं यापूर्वीच एकला चलोची भूमिका जाहीर केली आहे. तर शिवसेना व राष्ट्रवादीकडून अद्याप यावर स्पष्टपणे भाष्य करण्यात आलेलं नाही. तर भाजपकडून तीनही पक्षांविरोधात आघाडी उघडली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com