आमदार शिरसाटांना धक्का, पंढरपूर ग्रामपंचायतीत १७ पैकी १५ जागा जिंकत जि.प.सदस्य गायकवाडांची बाजी..

रमेश गायकवाड हे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांचे कट्टर विरोधक म्हणून देखील ओळखले जातात. ग्रामपंचायतीच्या निमित्ताने गायकवाड यांनी शिवसेनाला देखील मोठा धक्का दिल्याचे बोलले जाते.
Pandharpur Grampanchyat news Aurangabad
Pandharpur Grampanchyat news Aurangabad

औरंगाबाद ः शहराला लागून असलेली आणि औद्योगिक वसाहतीचा मोठा भाग ज्या ग्रामपंचायतीमध्ये येतो त्या पंढरपूरची ग्रामपंचायत निवडणुका जिल्हा परिषद सदस्य तथा रिपाइं (डेमोक्रॅटिकचे) प्रदेशाध्यक्ष रमेश गायकवाड यांनी एकाहाती जिंकली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पंढरपुर ग्रामविकास पॅनलचे १७ पैकी १५ उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेना व भाजपला या ठिकाणी प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

औरंगाबाद शहरातील महत्वाचा वाळूज आणि पंढरपूर औद्योगिक क्षेत्राचा भाग पंढरपूर ग्रामपंचायती अंतर्गत येतो. त्यामुळे ही ग्रामंपचायत मोठी आणि महत्वाची समजली जाते. शिवसेनेचे पश्चिम मतदारंसघाचे आमदार संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये रमेश गायकवाड यांच्या गटाला ९ तर ८ जागा शिवसेना-भाजपकडे होत्या.

यावेळी मात्र रमेश गायकवाड यांच्या पंढरपूर ग्रामविकास पॅनलने शिवसेना-भाजपला चांगलाच दणका दिला. १७ पैकी १५ उमेदवार निवडूण आणत गायकवाड यांनी या ग्रापंचायतीवर वर्चस्व मिळवले आहे. रमेश गायकवाड हे पंढरपूर जिल्हा परिषदेतूनच विजयी झालेले आहेत.

शिवाय रमेश गायकवाड हे शिवसेना आमदार संजय  शिरसाट यांचे कट्टर विरोधक म्हणून देखील ओळखले जातात. ग्रामपंचायतीच्या निमित्ताने गायकवाड यांनी शिवसेनाला देखील मोठा धक्का दिल्याचे बोलले जाते.

सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करतांनाच  जिल्हापरिषदे मार्फत झालेल्या विकासावर निवडणूक लढविली होती.यावेळी जनतेने विकासाला मतदान करत आमच्यावर विश्वास दाखवल्याचे रमेश गायकवाड म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com