मतदानाचा वाढलेला टक्का कुणाच्या पथ्थ्यावर..बोराळकर की चव्हाण? - Whose path will the increased percentage of voting fall on .. Boralkar or Chavan | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

मतदानाचा वाढलेला टक्का कुणाच्या पथ्थ्यावर..बोराळकर की चव्हाण?

जगदीश पानसरे
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

तुर्तास मतांचा आकडा वाढल्यामुळे बोराळकर आणि चव्हाण यांची धाकधुक वाढली आहे. सलग दोन निवडणुकीत विजय संपादन केल्यामुळे आणि आता तीन पक्षांची एकत्रित ताकद पाठीशी असल्याने चव्हाण हे हॅट्रीक साधतील असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जातोय. तर दुसरीकडे वाढलेले मतदान हे सतीश चव्हाण यांच्या विरोधाती नाराजीचे प्रतिक असून भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीच्या जोरावर यावेळी बोराळकर बाजी मारणार, अशी देखील चर्चा रंगली आहे.

औरंगाबाद ः मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी आज विक्रमी मतदानाची नाेंद झाली. २०१४ च्या निवडणुकीत केवळ ३८ टक्के इतक्या मतदानाची नाेंद झाली होती. तर आज सरासरी ६१ टक्के एवढ्या विक्रमी मतदानाची नाेंद झाल्याचे समजते. म्हणजेच गेल्यावेळच्या तुलनेत यावेळी तब्बल २३ टक्के मतदान अधिक झाले आहे. आता वाढलेला हा मतदानाचा आकडा कुणाच्या पथ्यावर पडतो?  हे तीन तारखेच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. महाविकास आघाडी विरुध्द भाजप अशी थेट लढत झालेली असतांना आता बोराळकर आणि चव्हाण यांच्या विजयासाठी काॅंटे की टक्कर होणार असेच दिसते.

राज्यातील सत्तांतरानंतरची पहिलीच निवडणूक असल्याने सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. मतदानाची टक्केवारी मराठवाड्यासह, पुणे, नागपूर पदवीधर मतदारसंघात देखील वाढलेली पहायला मिळते. भाजपकडून मतदानाचा वाढलेला टक्का पाहता आमच्या सर्व जागा निवडूण येणार असा दावा केला जातोय. तर महाविकास आघाडीकडून यावर अद्याप कुठलीच प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीने सतीश चव्हाण यांना तिसऱ्यांदा मैदानात उतरवले होते. तर त्यांच्या विरोधात भाजपने दुसऱ्यांदा शिरीष बोराळकरांना संधी दिली. भाजपने हा मतदारसंघ पुन्हा खेचून आणण्यासाठी सगळी शक्तीपणाला लावली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोराळकर यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी आग्रह धरला होता.

त्यानंतर पक्षात बंडाळी देखील झाली. पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे रमेश पोकळे यांनी अपक्ष निवडणूक लढवली. आता पोकळे यांच्या बंडखोरीचा फटका बोराळकर यांना बसतो की ती बंडखोरी त्यांच्या पथ्यावर पडते हे देखील निकालानंतर स्पष्ट होईल. २०१४ च्या पदवीधर निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनामुळ भाजपने ही निवडणूक सोडली होती. फारसा प्रचार न करता देखील बोराळकर यांना ५४ हजार मते तेव्हा मिळाली होती.

भाजपची ताकद दिसली...

यावेळी मात्र भाजपने पुर्ण ताकद वापर बुथ कार्यकर्त्यांच्या जोरावर संपुर्ण मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पदवीधर मतदारांचे मतदान करून घेतल्याचा दावा केला जातोय. वाढलेला मतदानाचा टक्का पाहता त्यात तथ्य वाटत असले तरी हे मतदान नेमके भाजपच्या वाट्याला गेले की मग महाविकास आघाडीच्या पारड्यात हे मतमाेजणीनंतरच स्पष्ट होईल.

तुर्तास मतांचा आकडा वाढल्यामुळे बोराळकर आणि चव्हाण यांची धाकधुक वाढली आहे. सलग दोन निवडणुकीत विजय संपादन केल्यामुळे आणि आता तीन पक्षांची एकत्रित ताकद पाठीशी असल्याने चव्हाण हे हॅट्रीक साधतील असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जातोय. तर दुसरीकडे वाढलेले मतदान हे सतीश चव्हाण यांच्या विरोधाती नाराजीचे प्रतिक असून भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीच्या जोरावर यावेळी बोराळकर बाजी मारणार, अशी देखील चर्चा रंगली आहे.

एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, प्रहार संघटना या पक्षाच्या उमेदवारांसह एकूण ३५ जण निवडणूक रिंगणात होते. बोराळकर-चव्हाण यांच्या प्रमुख लढत असली तरी वरील तीन्ही पक्षाचे उमेदवार कुणाच्या मतांवर आणि किती प्रमाणात डल्ला मारतात यावर महाविका आघाडी, भाजप उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख