सुरेश धसांमुळे भाजपची इभ्रत वाचली; जिल्हाध्यक्ष मस्के गावातच जेरीस..

भाजपचे आमदार असलेल्या केज, गेवराईतही भाजपची कामगिरी सुमार राहीली. जिल्हाध्यक्षांच्या बीड मतदार संघात तर भाजपच फारच दुर फेकली गेली. सुरेश धसांनी त्यांच्या आष्टी/पाटोदा/शिरुर कासार मतदार संघात चमकदार कामगिरी केली.
Dhas-Mhaske news Beed
Dhas-Mhaske news Beed

बीड : ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत जिल्ह्यात भाजपची पुरती फेफे झाली. अगदी आमदार आणि जिल्हाध्यक्षांच्या मतदार संघातही भाजपची पुरती पिछेहाट झाली. भाजप आमदार सुरेश धसांनी त्यांच्या आष्टी/पाटोदा/शिरुर कासार मतदार संघात चमकदार करुन भाजपची थोडीफार इभ्रत वाचवली. पण जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांना मात्र त्यांच्या पालवण गावची निवडणुक जिंकतानाच नाकी नऊ आले.

जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या होत्या. १८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित १११ ग्रामपंचायतींच्या ८४२ सदस्यांच्या निवडीसाठी शुक्रवारी मतदान होऊन सोमवारी मतमोजणी झाली. सुरुवातीलाच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी मतदार संघात भाजपची पुरती वाताहात झाल्याचे समोर आले.

नमिता मुंदडा आमदार असलेल्या केज व लक्ष्मण पवारांच्या गेवराईतही भाजपला फारशी चमक दाखविता आली नाही. जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंच्या बीड मतदार संघात अनेक ठिकाणी तर भाजपला पॅनलच उभे करता आले नाही. त्यांचेच गाव असलेल्या पालवणमध्ये त्यांना शिवसंग्राम, शिवसेनेसह इतर नेत्यांना सोबत घ्यावे लागले.

त्यातही त्यांच्या सगळ्यांना नऊ पैकी केवळ पाच जागा मिळाल्या आहेत. तालुक्यातही केवळ दोन ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. मात्र, सुरेश धसांनी त्यांच्या मतदार संघातील आष्टी, शिरुर कासार व पाटोदा या तीनही तालुक्यांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत यश मिळवून भाजपला काहीसा दिलासा दिला.

Edited By :Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com