उत्सफूर्तपणे झालेले मतदान माझ्या विजयाची नांदीच..

बुथ रचना आणि बुथप्रमुख हा भाजपचा महत्वाचा घटक. शहरी तसेत ग्रामीण भागातील अगदी तालुका, खेड्या गावात देखील भाजपचा कार्यकर्ता मतदान करून घेतांना दिसला. नेत्यांनी मराठवाड्यात येऊन प्रचार सभा, मेळावे घेत चांगली वातावरण निर्मिती केली. शिवाय मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात किमान शंभर उद्योजक घडवून त्यातून पदवीधर तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा माझा विचार मतदारांना निश्चितच भावला.त्यामुळे कुणी कितीही दावे करत असले तरी वाढलेले मतदान हे बदल्याच्या बाजूनेझाले आहे.
Graduate Candidate Shirish boralkar reaction news
Graduate Candidate Shirish boralkar reaction news

औरंगाबाद ः मराठवाडा पदवीधरच्या निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्तपणे केलेले मतदान ही बदलाची आणि माझ्या विजयाची नांदी ठरेल. विक्रमी असे झालेले मतदान हे प्रस्थापितांच्या विरोधात मतदारांनी दिलेला कौल आहे, त्यामुळे माझा विजय निश्चित असल्याचा दावा भाजप महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांनी केला आहे. भाजपची बळकट बुथ रचना मतदारांना बाहेर काढण्यात यशस्वी झाल्यामुळे मतदानाचा टक्का वाढला असेही बोराळकर म्हणाले.

मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी काल मतदान झाल्यानंतर उत्सूकता शिगेला पोहचली आहे. अनपेक्षितपणे मतदानाचा टक्का वाढला आणि सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक आता रंजक आणि काॅंटे की टक्कर अशा अवस्थेत पोहचली आहे. भाजपकडून वाढलेले मतदान म्हणजे प्रस्थापितांच्या विरोधातील ही चीड असल्याचा दावा केला जातोय.

भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांनी विजयाचा दावा करतांनाच तळागाळातील पदाधिकारी, कार्यकर्त्याने प्रचंड मेहनत घेतल्यामुळे मतदार मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडल्याचे म्हटले आहे. बोराळकर म्हणाले, बारा वर्षात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी पदवीधर, शिक्षक, बेरोजगार तरुणांच्या पदरी निराशच टाकली. केवळ द्वेषाचे आणि जातीचे राजकारण करण्यातच त्यांनी धन्यता मानली. त्यामुळे संस्थाचालक, पदवीधर मतदार, शिक्षक यांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी असल्याचे प्रचाराच्या दरम्यान दिसन आले.

या नाराजीतूनच मतदारांनी उत्सफूर्तपणे घराबाहेर पडून मतदान केले. मराठवाडा पदवीधरच्या निवडणुकीतील हे आतापर्यंतचे सर्वाधिक मतदान म्हणावे लागेल. पस्थापितांची नाराजी असतांना भाजपने मला पुन्हा संघी देत पदवीधरांना एक सक्षम पर्याय उपलब्ध करून दिला, आणि मतदारांनी तो स्वीकारला असे वाढलेल्या मतांवरून स्पष्ट होते.

२०१४ च्या निवडणुकीत अचनाक आमचे नेते गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झालेे आणि भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ही निवडणूक अक्षरशः सोडून दिली होती. तरी मला ५४ हजार मते मिळाली होती. त्यावेळी तब्बल १२ हजार मते बाद देखील झाली होती. अन्यथा तेव्हा देखील माझा विजय झाला असता. पण पक्षाने मला दुसऱ्यांदा संधी देत न्याय दिला. भाजपच्या प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्यांने मतदार नोंदणीपासून ते कालच्या मतदानापर्यंत प्रचंड मेहनत घेतली.

बुथ रचना आणि बुथप्रमुख हा भाजपचा महत्वाचा घटक. शहरी तसेत ग्रामीण भागातील अगदी तालुका, खेड्या गावात देखील भाजपचा कार्यकर्ता मतदान करून घेतांना दिसला. नेत्यांनी मराठवाड्यात येऊन प्रचार सभा, मेळावे घेत चांगली वातावरण निर्मिती केली. शिवाय मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात किमान शंभर उद्योजक घडवून त्यातून पदवीधर तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा माझा विचार मतदारांना निश्चितच भावला.त्यामुळे कुणी कितीही दावे करत असले तरी वाढलेले मतदान हे बदल्याच्या बाजूने झाले आहे. त्यामुळे यावेळी माझा विजय निश्चित आहे, याचा पुनरुच्चार देखील बोराळकर यांनी केला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com