शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत यांच्या पॅनलचा गावातच पराभव..

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने कन्नड- सोयगाव मतदारसंघात विक्रमी विजय मिळवत हा मतदारसंघ ताब्यात घेतला. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत देखील शिवसेना चांगले यश मिळवेल अशी आशा होती. कन्नड तालुक्यात शिवसेनेनेला समिश्र यश मिळाले आहे. तर विद्यमान आमदार उदयसिंह राजपूत यांना त्यांच्याच गावची ग्रामपंचायत ताब्यात घेता आली नाही.
mla udaysig rajput news aurangabad
mla udaysig rajput news aurangabad

कन्नड ः तालुक्यातील नागद येथील ग्रामपंचायत निवडणूक यंदा अनेक अर्थाने चांगलीच गाजली. येथे १५ जागांपैकी ८ जागा जिंकून काॅंग्रेसचे माजी आमदार नितीन पाटील यांच्या पॅनलची सरशी झाली आहे. विद्यमान शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांच्या पॅनलला ५ जागांवर समाधान मानावे लागले. तर दोन जांगावर अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला.

विद्यमान व माजी आमदार आमने सामने असल्याने या निवडणुकीकडे जिल्ह्यातील जाणकारांचे लक्ष लागून होते. या गावाने कन्नड तालुक्याला समृद्ध नेतृत्व दिलेले आहे. नागद या गावाला मोठी राजकीय परंपरा असून.माजी आमदार स्व.नारायणराव नागदकर, माजी आमदार नितीन पाटील आणि आता आमदार उदयसिंग राजपूत असे  तीन आमदार या गावाने दिले आहेत. शिवाय जिल्हा बँकेचे अध्यक्ष स्व.सुरेश पाटील हेही याच गावचे होते.

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने कन्नड- सोयगाव मतदारसंघात विक्रमी विजय मिळवत हा मतदारसंघ ताब्यात घेतला. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत देखील शिवसेना चांगले यश मिळवेल अशी आशा होती. कन्नड तालुक्यात शिवसेनेनेला समिश्र यश मिळाले आहे. तर विद्यमान आमदार उदयसिंह राजपूत यांना त्यांच्याच गावची ग्रामपंचायत ताब्यात घेता आली नाही.

माजी आमदार नितीन पाटील जे सध्या जिल्ह्याच्या राजकारणातून अलिप्त आहेत. त्यांनी गावच्या निवडणुकीत मात्र रस दाखवत जोरही लावला. त्यांच्या  गटाचे आदर्श परिवर्तन विकास पॅनलचे ८ उमेदवार विजयी झाले.  यामध्ये अहिरे प्रकाश राजधर ,माया  मयाराम तेवर, शोभाबाई भिमराव अहिरे, गोठवाळ नामदेव भावसिंग, मासरे रत्ना दिपक,अलका विजय सूर्यवंशी,,रणजीत भास्करराव ठाकरे यांचा समावेश आहे.

तर उदयसिंग राजपूत यांच्या जनसेवा ग्रामविकास पॅनलचे विकास सरदारसिंग राजपूत, नाना देवराम अहिरे, रुपाली सुनील कुमावत, कांताबाई हिरालाल राजपूत, व मोगलबाई यादव राजपूत विजयी झाले आहेत. तसेच  मदनसिंग रुपसिंग लोदवाळ व बापू विक्रम मोरे हे दोन अपक्ष उमेदवार निवडून आले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com