सतीश चव्हाणांच्या विजयासाठी शिवसैनिकांनी खूप मेहनत घेतली..

ही निवडणूक आपली आहे हे ठरवूनच शिवसैनिकांनी मन लावून काम केले. एखाद्या सार्वत्रिक निवडणूकीत शिवसैनिक जसे मतदान करून घेण्यासाठी पेटून उठतात तसेच काम पदवीधरच्या निवडणुकीत शिवसेनेने केले आहे. मतदानाच्या दिवशी प्रत्येक बुथवर शिवसैनिक शेवटपर्यंत हजर होते. राष्ट्रवादी- शिवसेना आणि काॅंग्रेसच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कष्टाचे फळ सतीश चव्हाण यांच्या विजयाच्या रुपात मिळाले.
Shivsena ledear chandrakant khaire reaction news
Shivsena ledear chandrakant khaire reaction news

औरंगाबाद ः मराठवाडा पदवीधर मतदारसंघामध्ये सतीश चव्हाण तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. यावेळी त्यांना मिळालेले मताधिक्य हे देखील आतापर्यंतचे विक्रमी मताधिक्य आहे. महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांनी घेतलेली मेहनत याचे हे यश आहे. चव्हाण यांच्या विजयात शिवसेनेचा मोठा वाटा असून त्यासाठी शिवसैनिकांनी खूप मेहनत घेतल्याचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी `सरकारनामा`शी बोलतांना सांगितले.

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांनी भाजपच्या बोराळकरांचा दारूण पराभव केला. चव्हाण यांनी १ लाख १६ हजाराहून अधिक मते घेत एकहाती विजय मिळवला. लढत काट्याची होईल, दुसऱ्या पंसतीची मते मोजावी लागतील, चव्हाण यांना नाराजीचा फटका बसेल असे अनेक अंदाज मतदानाची आकडेवारी वाढल्यानंतर व्यक्त केले गेले. पण ते सगळ खोटे ठरवत महाविकास आघाडीने विक्रमी मताधिक्य मिळवत विजय संपादन केला.

या विजयाबद्दल शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आनंद व्यक्त करतांना शिवसैनिकांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच हे शक्य झाल्याचे म्हटले आहे. खैरे म्हणाले, शिवसेना सतीश चव्हाण यांचा प्रचार करणार का? त्यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात काम केले वगैरे गोष्टीची चर्चा विरोधकांकडून केली गेली. आम्ही प्रचार केला नाही, फक्त दिखावा केला असा आरोप देखील भाजपच्या मंडळींकडून केला गेला. पण त्यात कुठल्याही प्रकारचे तथ्थ्य नाही हे निकालावरून स्पष्ट झाले आहे.

उलट शिवसेनेने सतीश चव्हाण यांचे काम केले नाही, असे म्हणणाऱ्यांनी त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराचे काम केले का? हा खरा प्रश्न आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे प्रमुख आहेत आणि त्यांनी सतीश चव्हाण यांना विजयी करण्यासाठी शिवसेनेची संपुर्ण ताकद त्यांच्या पाठीशी उभी करण्याचे आदेश आम्हाला दिले होते. साहेबांचा आदेश आम्हा शिवसैनिकांसाठी अंतिम शब्द असतो. त्यामुळे आम्ही जिल्हा तसेच मराठवाड्यात सतीश चव्हाण यांच्या प्रचारात स्वतःला झोकून दिलेे होते.

ही निवडणूक आपली आहे हे ठरवूनच शिवसैनिकांनी मन लावून काम केले. एखाद्या सार्वत्रिक निवडणूकीत शिवसैनिक जसे मतदान करून घेण्यासाठी पेटून उठतात तसेच काम पदवीधरच्या निवडणुकीत शिवसेनेने केले आहे. मतदानाच्या दिवशी प्रत्येक बुथवर शिवसैनिक शेवटपर्यंत हजर होते. राष्ट्रवादी- शिवसेना आणि काॅंग्रेसच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कष्टाचे फळ सतीश चव्हाण यांच्या विजयाच्या रुपात मिळाले.

सतीश चव्हाण यांना तिसऱ्यांदा ते देखील मोठ्या मताधिक्याने निवडूण आणू असा शब्द शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला होता. तो आम्ही खरा करून दाखवला, असेही चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. महाविकास आघाडीची एकजूट पाहूनच विरोधी पक्षाच्या नेत्यांचे धाबे दणाणले होते. त्यांच्याकडे उमेदवारीवरूनच नाराजी होती. तर सतीश चव्हाण यांना उमेदवारी निश्चित असल्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदार नाेंदणी केली होती. त्यामुळे त्यांच्या विजय होणार याची आम्हाला खात्री होती, असेही खैरे म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com